नवी दिल्ली : कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी स्वामी विवेकानंद यांचे शिकागो येथील भाषण हे सार्वभौम असून, सर्वकाळ संदेश देणारा महत्त्वपूर्ण दस्ताऐवज असल्याचे म्हटले आहे. त्यांचा संदेश म्हणजे आजच्या असहिष्णुता आणि बिघडलेल्या वातावरणात पुढे जाण्याचा जणून 'मॅग्ना कार्टा'च असल्याचे सोनिया गांधी यांनी म्हटले आहे.


स्वामी विवेकांनंद यांनी शिकागो येथील धर्म परिषदेत केलेल्या व्याख्यानाला सोमवारी (११ सप्टेंबर) १२५ वर्षे पूर्ण झाली. त्याबाबत आनंद व्यक्त करताना सोनिया गांधी यांनी म्हटले आहे की, शिकागोतील परिषदेत विवेकानंदांनी सांप्रदायीकता, मतांधता आणि कट्टरतावाद याबाबत जे विचार व्यक्त केले होते. तीच स्थिती आजही कायम असून, आजच्या स्थितीवरच ते विचार भाष्य करतात असे जाणवते.
स्वामी विवेकानंद यांचे विचार आजवर मार्गदर्शन करत आले आहेत. तसेच, ते यापुढेही मार्गदर्शकच राहतील असेही सोनियां गांधी यांनी म्हटले आहे.