नवी दिल्ली : हरीतक्रांतीचे जनक अशी ख्याती असलेले कृषीतज्ज्ञ एमएस स्वामीनाथन यांनी मोदी सरकारवर स्तुतीसुमनं उधळली आहेत. मोदी सरकारने राबवलेल्या कृषी धोरणांबाबत स्वामीनाथन यांनी समाधान व्यक्त केलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राष्ट्रीय कृषी आयोगाने सुचवलेल्या अनेक शिफारसी मोदी सरकारने राबवल्या आहेत असं स्वामीनाथन यांनी ट्वीट केलंय. सुधारीत बियाणं, मृदा परिक्षण पत्रिका, सुधारीत विमा या शिफारशी राबवण्यात आल्याचं स्वामीनाथन म्हणतात.


कृषी विद्यापीठांद्वारे ग्रामीण महिलांच्या कौशल्य वृद्धीसाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नांबाबतही स्वामीनाथन यांनी समाधान व्यक्त केलं. कृषी कर्जमाफी आणि भविष्यातली कृषीक्षेत्रातल्या पायाभूत सुविधा सुधारण्याबाबतही संतुलन साधण्याचं स्वामीनाथन म्हणाले.