नवी दिल्ली : महात्मा गांधी यांची हत्या झाली, त्यावेळी असे काही लोक होते की त्यांनी याचा आनंद साजरा केला. आज तेच लोक सत्तेत बसले आहेत, असा हल्लाबोल अभिनेत्री स्वरा भास्कर हिने केला आहे.  दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत स्वरा भास्करने आपली भूमिका मांडली आहे. तिच्या या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तविण्यात आलेय.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महात्मा गांधींना जेव्हा ठार करण्यात आले तेव्हा सगळा देश शोकसागरात बुडाला होता. तरीही काही लोक असे होते ज्यांनी आनंद व्यक्त करत उत्सव साजरा केला. ते लोक आज सत्तेत आहेत आहेत. त्यांना आपण तुरुंगात टाकणार का? तर त्याचे उत्तर नाही, असेच आहे. असे स्वरा भास्करने हिने म्हटले आहे. तिने स्पष्टपणे कोणाचेही नाव घेतले नाही.



सद्यस्थितीत समाजात काहीही झाले की तुरुंगात टाका, असे म्हटले जाते. रक्तपिपासू समाज होणे ही चांगली बाब नाही, असेही स्वरा हिने म्हटले आहे. भिंद्रनवाले यांनाही काही लोक संत म्हणत त्या सगळ्यांनाही उचलून तुरुंगात टाकणार का? असाही प्रश्न स्वरा भास्करने उपस्थित केला आहे.