देशातील एक अशी नदी, जेथे पाण्यासोबत सोनंही वाहतं... अनेक वर्ष लोकांच्या कमाईचं साधन ठरतेय `ही` नदी
पाण्यासोबत सोनंही घेऊन वाहते ही नदी, म्हणून आहे खास
मुंबई : SwarnaRekha River : भारतात ४०० हून अधिक छोट्या - मोठ्या नदी वाहतात. देशात वाहणाऱ्या नद्यांच खूप वेगळेपण आहे. मात्र आज आपण अशा नदीबद्दल वाचणार आहोत. ज्या नदीत पाण्यासोबत सोन्याचाही प्रवाह वाहतो. तुम्ही जे वाचताय ते खरं आहे. या पाण्यात सोनं सापडतं. तुम्हाला वाचून धक्का बसेल पण शेकडो वर्षांपासून तज्ज्ञ या नदीतून पाण्यासोबत सोनं कसं वाहतं? या प्रश्नाच्या शोधात आहे.
नदीतून सोनं निवडण्याचं काम करतात हे लोकं
झारखंडमध्ये वाहणारी स्वर्णरेखा (Swarna Rekha River in Jharkhand) नदीमध्ये पाण्यासोबत सोनं देखील वाहत आहे. म्हणून या नदीला स्वर्णरेखा नदी म्हणून ओळखलं जातं. झारखंडमध्ये एक जागा अशी आहे. जेथे स्थानिक आदिवाशी या नदीत सकाळी जातात. दिवसभर चाळणीच्या मदतीने सोने एकत्र कळतात. या कामात अनेक पिढ्या लागल्या आहेत.
बंगालच्या खाडीला जाऊन मिळते ही नदी
ही नदी झारखंड, पश्चिम बंगाल आणि ओडिसा जिल्ह्यातून वाहते. या नदीचा उगम झारखंडच्या रांची शहरापासून जवळपास १६ किमी दूर होतो. महत्वाचं म्हणजे ही नही मधल्या कोणत्याही प्रवाहाला भेटत नाही. ती सरळ बंगालच्या खाडीला जाऊन मिळते.
सोन्याच्या भेटीमागचं सत्य अद्यापही अस्पष्ट
मीडिया रिपोर्टनुसार, येथे संशोधन केलेल्या संशोधकांच्या म्हणण्यानुसार, ही नदी अनेक डोंगर रांगांमधून येते. यामुळेच या प्रवाहात सोन्याचे कण दिसतात. मात्र अद्याप याबाबत माहिती मिळालेली नाही.
काही लोकांचं असं म्हणणं आहे
स्वर्णरेखासोबत वाहणारी नदी 'करकरी'. या नदीच्या प्रवाहातही सोन्याचे कणही भेटतात. काही लोकांना असं वाटतं की, स्वर्णरेखा नदीत सापडणारे सोने हे करकरी नदीतून वाहत येतात.
सोपं नाही नदीतून सोनं काढणं
नदीच्या प्रवाहातील रेती काढून सोनं एकत्र करणं हे काही सोपं काम नाही. आदिवासी कुटुंबातील लोकं दिवसभर पाण्यात उभं राहून सोन्याचे कण शोधतात. दिवसभर थांबल्यानंतर एका व्यक्तीला एक ते दोन कण सोनं सापडतं. त्याला विकून ८० ते १०० रुपये मिळतात. एक व्यक्ती महिन्याभरात ५ ते ८ हजार रुपये कमावतो.