मुंबई : Food : Goods and Services Tax : नव्या वर्षाच्या सुरुवातीपासून तुम्हाला ऑनलाईन ऑर्डर करणे आता महाग पडणार आहे. (Online Food Order) झोमॅटो, स्विगीवरून जेवण मागवणे महागणार आहे. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. 1 जानेवारीपासून खाद्यपदार्थ ऑर्डर करण्यावर GST आकारण्यात येणार आहे. याचा झटका फूड डिलिव्हरी कंपन्यांच्या ग्राहकांना बसणार आहे. (Swiggy, Zomato to collect 5% GST from customers from January 1 - Know effect on food delivery cost)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नोकरीच्या ठिकाणी तसेच कंटाळा आला तर घरी ऑनलाईन फूड मागविले जाते. मात्र, झोमॅटो आणि स्विगीवरुन जेवण मागविणे महाग पडणार आहे. 1 जानेवारीपासून ग्राहकांकडून खाद्यपदार्थ ऑर्डर करण्यावर जीएसटी आकारण्यास या कंपन्या सुरुवात करणार आहेत. ( Goods and Services Tax (GST) 



केंद्र सरकारने झोमॅटो आणि स्विगी सारख्या खाद्यपदार्थ वितरित करणाऱ्या ई कॉमर्स ऑपरेटर्सवर 5 टक्के जीएसटी लावला आहे.  सध्या रेस्टॉरंट हा कर भरतात, मात्र नवीन नियमानुसार फूड डिलिव्हरी ई-कॉमर्स ऑपरेटर्स हा कर भरतील, असा नियम करण्यात आला आहे. 


फूड टेक कंपन्यामुळे सरकारचा मोठा कर तोटा होत आहे. हा तोटा सुमारे 2 हजार कोटींचा आहे. हा तोटा भरुन काढण्यासाठी आता जीएसटी आकारण्यात येणार आहे. दरम्यान, मात्र फूड डिलिव्हरी अॅप्स ग्राहकांकडून कोणत्या ना कोणत्या स्वरूपात हा कर वसूल करतील, अशी शक्यता आहे. त्यामुळे 1 जानेवारीपासून ऑनलाईन खाद्यपदार्थ ऑर्डर करणे महाग होण्याची शक्यता आहे.