मुंबई : स्विस बॅंकेतील काळा पैसा भारतात आणू, काळा पैसा स्विस बॅंकेत ठेवणाऱ्यांची नावे जाहीर करू असे अश्वासन देऊन सत्तेत आलेल्या मोदी सरकारला ४ वर्षे पूर्ण झाली. काळा पैसा किंवा त्या खातेदारांना अद्याप काही शिक्षा झाल्याचे ऐकिवात नाही.  तरीही स्विस बँकेतली भारतीयांच्या खात्यांमधली रक्कम  आता दुप्पट झाल्याचे समोर आलंय.


रक्कम वाढली 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोदी सरकार काळ्या पैशाविरोधात आक्रमक झालेलं असताना स्विस बँकेतली रक्कम दुप्पट झालीय. स्विस नॅशनल बँकेनं नुकताच त्यांचा अहवाल जारी केलाय. त्यामध्ये भारतीयांची स्विस बँकेतली रक्कम सात हजार कोटी झाल्याचं सांगण्यात आलंय. 


सरकारच्या उद्दीष्टाला हरताळ 


 २०१६ मध्ये स्विस बँकेतल्या भारतीयांच्या रकमेत घट होऊन ती साडे चार हजार कोटींपर्यंत खाली आली होती... पण दोन वर्षांत ही रक्कम दुप्पट झालीय...  संपूर्ण जगभरातून स्विस बँकेत शंभर लाख कोटी जमा आहेत... त्यापैकी सात हजार कोटी रुपये हे भारतीयांचे आहेत... काळ्या पैशाला आळा घालण्याच्या मोदी सरकारच्या उद्दिष्टाला हरताळ फासला गेल्याचंच यावरुन समोर आलंय.