मुंबई : हिवाळा संपला आणि आता कडक उन्हाळा सुरू झाला आहे. बाहेर निघालं की शरीराची अक्षरश: लाही-लाही होण्यास सुरुवात झाली आहे. उन्हाळ्यात पाण्याचे जास्त सेवन हे अधिक लाभदायक आहे. उन्हाळ्यात सर्वात जास्त त्रास लहान मुलांना होतो. त्यांच्या त्वचेला होत असतो. त्याचप्रमाणे शरीरातील पाण्याची कमतरता आणि डायरीया यांसारख्या समस्या उद्भवतात. अशा परिस्थितीत त्यांची कशी काळजी घेतली पाहिजे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

- लहान मुलांना सुती कपडे घालता येतील याकडे लक्ष द्या. पण कपडे घट्ट नको. सिंथेटिक कापड वापरल्यामुळे मुलांच्या अंगात उष्णता टिकून राहते. त्यामुळे त्यांच्या अंगावर घामोळ्या येऊ शकतात. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतंही क्रीम लावू नका.


- उन्हाळ्यात मुलांच्या झोपण्याच्या गादीवर सुती चादर अंथरायला हवी. सुती चादर त्वचेसाठी फार लाभदायक असते. 


- डायपरचा वापर कमी करण्याकडे कल असला पाहीजे. डायपरमुळे त्वचेला इजा पोहोचतात. त्याऐवजी कपड्याचा वापर करा. त्यामुळे त्वचा कोरडी राहते. 


- लस्सी, मिल्क शेक, फळांचा ताजा रस अणि नारळपणी अशा पदार्थांचा समावेश मुलांच्या आहारात असायला हवा. जर तुमचं बाळ सहा महिन्यांपेक्षा लहान असल्यास आणि फक्त स्तनपान करत असल्यास त्याला अतिरिक्त पाण्याची गरज नाही. कारण या दुधात मुळातच पाणीच असते.  


- जी मुले बाटलीने दूध पितात त्यांच्यासाठी गरम पाणी उकळून थंड केलेले पाणी देणे हितकारक ठरते.


- उन्हाळ्यात मुलांची मालिश टाळावी. कारण मालिश करताना वापरले जाणरे तेल आणि पेट्रोलियम जेलीमुळे त्यांच्या त्वचेवरचा घाम तसाच राहतो. 


- मालिश करायचीच असल्यास ऑलिव्ह ऑईल किंवा नारळाच्या तेलाचा वापर करावा. मात्र अंघोळीच्या वेळी हे तेल पूर्णत: स्वच्छ होईल, याकडे लक्ष द्यावे.    


-ऊन वाईट नाही. लहान मुलांची उंची वाढते, उंची चांगल्या प्रकारे वाढण्यासाठी कोवळ्या उन्हाचा उपयोग होतो.


- शरीरातील ‘ड’ जीवनसत्त्वाची कमतरता आणि हाडांची झीज टाळण्यासाठीही त्वचेवर कोवळे ऊन पडणे चांगलेच. शिवाय ऊन हे जंतूंचा नाश करणारे आहे. कडक उन्हापासून मात्र काळजी घ्यायलाच हवी.


घामोळ्यांसाठी घरगुती उपाय


- ताक किंवा दह्यातील पाणी घाम आलेल्या जागी लावावे.  
- मुलतानी माती किंवा गुलाब पाण्याचाही वापर करू शकता. दहा मिनिटांनंतर धुवून टाका.
- बाजारात मिळणाऱ्या घामोळ्यांच्या पावडरीचा वापर टाळा.