चेन्नई : देशभरात आज सकाळपासून लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरुवात झाली. यामध्ये काही उमेदवारांचा निकाल स्पष्ट झाला, तर अजूनही काही उमेदवारांमध्ये चढाओढ पाहायला मिळत आहे. अशातच अभिनेता कमल हासन यांच्या पक्षाला  नोटापेक्षाही कमी मतं मिळाल्याचं समोर आलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेता कमल हासन यांनी मक्कल निधी मय्य्म या पक्षाची स्थापना केली. या पक्षाच्या माध्यमातून त्यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला. हासन यांच्या पक्षाने स्थानिक विधानसभा निवडणुकी सोबतच लोकसभा निवडणुकीत नशिब आजमावलं.


तामिळनाडूमधील २० जागांसाठी त्यांनी निवडणुक लढवली. या पोटनिवडणुकीमध्ये हासन यांच्या पक्षाला नोटा पर्यायापेक्षा कमी मतदान झाल्याचे समोर आले. या एकूण २० मतदारसंघापैकी ४ मतदारसंघामध्ये नोटापेक्षा कमी मतं मिळाली आहेत. या मतदारसंघामध्ये तिरुवरुर, विलतीकुलम आणि पपीरेड्डीपट्टी यांचा समावेश आहे.


वादग्रस्त वक्तव्य


कमल हासन यांनी निवडणुकीच्या प्रचारादरम्यान वादग्रस्त वक्तव्य केले होते. नथुराम गोडसे हा हिंदू दहशतवादी होता, असे ते म्हणाले होते. त्यामुळे कमल हासन यांच्यावर चहुबाजूंनी टीका झाली होती.


वादग्रस्त् वक्तव्यामुळे हासन चांगलेच चर्चेत आले. परंतु त्यांना याचा फायदा मतदानासाठी करता आला नाही. त्यामुळे हासन यांच्या पक्षाचा दबदबा दक्षिणमध्ये कमी असल्याचे पाहायला मिळाले


.