तामिळनाडूतील (tamil nadu) कुड्डालोरमध्ये (cuddalore) एका खासगी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये प्रेमप्रकरणावरून जोरदार हाणामारी (college students fight) झाली. यादरम्यान त्यांनी एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. विद्यार्थ्यांच्या भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ते रस्त्याच्या मधोमध भांडताना दिसत आहेत. (tamil nadu private college student group fight for one girl)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माध्यमांच्या वृ्त्तानुसार, वरुण आणि सुधाकर नावाचे दोन विद्यार्थी एकाच मुलीच्या प्रेमात पडले होते. ही मुलगी विरुधाचलम भागात असलेल्या त्याच कॉलेजची विद्यार्थिनी आहे, जिथे ते दोघेही शिकतात. वरुण आणि सुधाकर यांनी आपापल्या मित्रांचा ग्रुप तयार केल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्यात एकाच मुलीवरुन  भांडण झाले आणि ते प्रकरण हाणामारीपर्यंत पोहोचलं.


विद्यार्थ्यांमध्ये मारहाणीची ही घटना 28 ऑक्टोबर रोजी घडली होती. प्रत्यक्षात विद्यार्थी कॉलेज बसची वाट पाहत होते. यादरम्यान वरुण आणि सुधाकर यांच्यात मुलीवरुन वाद सुरू झाला. त्यानंतर दोघांचेही मित्र भांडणात सहभागी झाले. काही वेळातच त्यांच्यात हाणामारी सुरू झाली आणि पोलिसांना मध्यस्तीसाठी यावे लागले.


विद्यार्थ्यांचे फाटले शर्ट


व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये मुले रस्त्यावरच एकमेकांना लाथा मारताना दिसत आहेत. अनेक विद्यार्थ्यांचे शर्ट फाटले आहेत. काही लोक मारहाण थांबवण्याचा प्रयत्न करताना दिसतात. पण परिस्थिती आणखी बिघडत गेली. घटनास्थळी आणखी बरेच लोक उपस्थित आहेत जे हे सर्व शांतपणे पाहत आहेत. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी सहा विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले आहे.