नवी दिल्ली : CDS Bipin Rawat death भारतातील तिन्ही संरक्षण दलांचे प्रमुख जनरल बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टरला बुधवारी भीषण अपघात झाला. अपघाताची तीव्रता इतकी होती की यामध्ये आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाला. जनरल बिपीन रावत यांचा आणि त्यांच्या पत्नीचाही यामध्ये करुण अंत झाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मधुलिका रावत यासुद्धा अपघाताक्षणी जनरल राव यांच्यासोबत त्याच हेलिकॉप्टरमध्ये होत्या. एका कार्यक्रमासाठी गेले असता त्यांच्या हेलिकॉप्टरला कुन्नूरच्या जंगलात मोठा अपघाता झाला आणि ही धक्कादायक बातमी सर्वांना हादरा देऊन गेली. 



सारा देश या धक्क्यातून सावरत असतानाच काही तासांनी जनरल रावत यांचं निधन झाल्याची बातमी अधिकृतपणे जाहीर करण्यात आली. 


जनरल रावत आणि त्यांच्या पत्नीचा असा करुण अंत झाल्यामुळं त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगरच कोसळला आहे. 


जनरल रावत यांच्या पश्चात आता त्यांच्या दोन मुलींचंच कुटुंब उरलं आहे. या दोन्ही मुलींच्या जीवनातून त्यांचा सर्वात मोठा  आधार हिरावल्यामुळं हा धक्का पचवण्यासाठी सारा देश त्यांच्यासोबत उभा आहे. 


6 वर्षांपूर्वी हेलिकॉप्टर क्रॅशमधून बचावले होते संरक्षण दलाचे प्रमुख बिपीन रावत


एका कुटुंबामध्ये भीषण घटनेनं क्षणात होत्याचं नव्हतं होणं किती वेदनादायी असतं हेच जनरल रावत यांच्या जाण्यानं आता पाहाय़ला मिळत आहे. 


सध्याच्या घडीला राजकीय वर्तुळ, सर्व संरक्षण दलांच्या वतीने सीडीएस जनरल बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत, तसंच अपघातात मृत पावलेल्या इतर अधिकारी आणि सैन्यदलाच्या सेवेत असणाऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.