Viral News : एक वर्षेभर बंद घर त्या कुटुंबातील सर्वजण दुबईला रहायला असतात. ते काही कार्यक्रमानिमित्त घरी येतात आणि घरातील एक वस्तू उघडतात आणि मोठा स्फोट होतो. या घटनेमध्ये जीवितहानी झाली असून तीन भावंडांचा मृत्यू झाला आहे. नक्की असं  काय घडलं की ज्यामुळे या भावंडांना आपला जीव गमवावा लागला. भावंडांमध्ये गिरिजा वय 63, एस. राधा वय 55 आणि भाऊ राजकुमार वय 48 अशी मृतांची नावे आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेमकं काय घडलं? 
गिरिजाच्या पतीच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त तिन्ही भावंड दुबईहून तामिळनाडूत 2 नोव्हेंबरला आले होते. जवळपास वर्षेभरानंतर ते घरी आले होते, वर्षानंतर घरातील बंद फ्रीज चालू केला. त्यामुळे मोठा स्फोट झाला त्यानंतर त्यामधून विषारी वायू बाहेर पडल्याने तिथं झोपलेल्या तीन भावंडांचा मृत्यू झाला. 


जिल्हाधिकारी राहुल नध यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. त्यानंतर, घर जवळपास वर्षभर बंद होते आणि फ्रीज बराच काळ वापरात नव्हता. हा स्फोट शॉर्ट सर्किटमुळे झाला आहे का, याचा तपास सुरू असल्याचं राहुल नध यांनी सांगितलं.


या अपघातामध्ये राजकुमारची पत्नी भार्गवी वय 41 आणि मुलगी आराधन वय 7 जखमी झाली आहे. दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. कुटुंबातील सदस्य ज्या खोलीत झोपले होते त्या खोलीत रेफ्रिजरेटरचा स्फोट झाल्यानंतर विषारी वायू पसरला आणि श्वास घेतल्यानंतर तिघांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समजली आहे.