लेखिका तस्लिमा नसरीन यांचे मदर तेरेसांवर गंभीर आरोप
मदर तेरेसा या प्रसिद्ध होत्या म्हणून त्यांची पाठराखण करू नका अनेक अमानुष, बेकायदा आणि रानटी कृत्यांमध्ये त्यांचा सहभाग होता`, असा गंभीर आरोप तस्लिमा नसरीन यांनी ट्विटमधून केलाय.
नवी दिल्ली: वादग्रस्त लेखिका तस्लिमा नसरीन यांनी मदर तेरेसा यांच्यावर गंभीर आरोप केलेत. मदर तेरेसा जी संस्था चालवत होत्या, त्या संस्थेवर मूल विक्रीचा आरोप झाला. यांत नवीन काय आहे अशा शब्दांत नसरीन यांनी मदर तेरेसा आणि त्यांच्या संस्थेवर आरोप केलेत.
तेरेसांची पाठराखण करू नका
'मदर तेरेसा या प्रसिद्ध होत्या म्हणून त्यांची पाठराखण करू नका अनेक अमानुष, बेकायदा आणि रानटी कृत्यांमध्ये त्यांचा सहभाग होता', असा गंभीर आरोप तस्लिमा नसरीन यांनी ट्विटमधून केलाय. गुन्हेगार समाजसेवक म्हणून प्रसिद्ध झाले असतील म्हणून त्यांना पाठिंबा देण्याची गरज नाही असंही नसरीन यांनी म्हटलंय.
मिशनरीच्या कर्मचाऱ्यांवर मूल विकल्याचा आरोप
मिशनरीज ऑफ चॅरिटीच्या कर्मचाऱ्यांनी उत्तर प्रदेशातील सोनभद्र जिल्ह्यातील एका जोडप्याला मूल विकले होते. याप्रकरणी मिशनरीज ऑफ चॅरिटीच्या एका महिला कर्मचाऱ्याला अटक झाली आहे. अन्य दोघांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरु आहे.