Gyanvapi Masjid प्रकरणात तस्लिमा नसरीन यांचा सल्ला, लोकांनी Tweet वर घेतली `शाळा`
Taslima Nasreen tweet on Gyanvapi Masjid:वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीचे सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे. त्याचा अंतिम अहवाल आज वाराणसी न्यायालयात सादर केला जाईल. दरम्यान, बांग्लादेशच्या प्रसिद्ध लेखिका तस्लिमा नसरीन यांनी ट्विट करुन ज्ञानवापी मशिदीच्या संदर्भात सल्ला दिला आहे.
मुंबई : Taslima Nasreen tweet on Gyanvapi Masjid:वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीचे सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे. त्याचा अंतिम अहवाल आज वाराणसी न्यायालयात सादर केला जाईल. दरम्यान, बांग्लादेशच्या प्रसिद्ध लेखिका तस्लिमा नसरीन यांनी ट्विट करुन ज्ञानवापी मशिदीच्या संदर्भात सल्ला दिला आहे, त्यानंतर ट्विटर यूजर्सनी तस्लिमा यांचा चांगलाच क्लास घेतला आहे.
तस्लिमा नसरीन यांचा प्रार्थनास्थळ बांधण्याचा सल्ला
तस्लिमा नसरीन (Taslima Nasreen) यांनी ट्विट करुन म्हटले की, 'प्रत्येकासाठी एक मोठे प्रार्थनास्थळ असणे चांगले. यात 10 खोल्या असाव्यात. एक खोली हिंदूंसाठी (सर्व जाती), मुस्लिमांसाठी (सर्व पंथ), एक खोली ख्रिश्चनांसाठी (सर्व पंथ), एक खोली बौद्धांसाठी, एक शीख आणि एक ज्यू, एक खोली जैन आणि पारशींसाठी. वाचनालय, अंगण, बाल्कनी आणि शौचालय व खेळण्याची खोली असावी.
सोशल मीडिया घेतली 'शाळा'
तस्लिमा नसरीन यांनी (Taslima Nasreen) सर्वांसाठी प्रार्थनास्थळ बांधण्याचा सल्ला दिल्यानंतर त्यांना ट्रोलचा सामना करावा लागला आणि लोकांनी त्यांचा क्लास घेतला. एका यूजर्सने म्हटले की, 'हिंदू मंदिर हे देवाचे निवासस्थान आहे, जिथे त्याचे जीवन पवित्र केले जाते. इतर धर्मांच्या प्रार्थनास्थळाच्या संकल्पनेपेक्षा हे वेगळे आहे. त्याचवेळी आणखी एका यूजरने म्हटले की, 'जय हो ज्ञानवापी मंदिर तुम्ही आतून खूप उदास दिसत आहात.'
तस्लिमा नसरीन यांच्या पोस्टवर आणखी एक युजर म्हणाला, 'नाही, धन्यवाद. त्याची अंमलबजावणी पाकिस्तान आणि बांग्लादेशात व्हायला हवी. तुमच्या फॉर्म्युल्याशिवाय भारतीय चांगले आहेत. भारतात बसून तुम्ही फुकटात असा सल्ला देऊ शकता, कृपया बांग्लादेश किंवा पाकिस्तानमध्ये असा सल्ला देण्याचा प्रयत्न करा. नेहरुनी व्होट बँक आणि राजकारणासाठी भारताचे धर्मनिरपेक्षीकरण केले.
शिवलिंगाचा दावा पुढे आला
वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीत (Gyanvapi Masjid) तीन दिवसांच्या सर्वेक्षणानंतर सोमवारी एक शिवलिंग सापडल्याचा दावा हिंदू पक्षाने केला आहे, त्यानंतर न्यायालयाने शिवलिंगाभोवती फिरण्यास मनाई करणारा आदेश जारी केला आहे. यासोबतच शिवलिंगाचे जतन करण्याचे आणि प्रांगणाला सुरक्षा देण्याचे आदेश न्यायालयाने दिले. हिंदू पक्षाने सांगितले की, सर्वेक्षणात नंदीच्या मूर्तीजवळ 12 फुटांचे शिवलिंग सापडले आहे.