Tata Group Stock: शेअर बाजारात गुंतवणूक करणं जोखीमचं असतं. विचारपूर्वक गुंतवणूक केल्यास चांगला फायदा होऊ शकतो. त्यामुळे गुंतवणूक करताना गुंतवणूकदारांना भविष्याचा वेध घेणं आवश्यक असतं. गुंतवणुकीसाठी चांगल्या कंपन्या शोधणं आवश्यक आहे. अशाच एका शेअरबाबत शेअर मार्केट (Share Market) तज्ज्ञांनी सल्ला दिला आहे. टाटा ग्रुपच्या एअर कंडिशनिंग आणि इंजिनिअरिंग सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनी व्होल्टासच्या (Voltas) स्टॉकबाबत तज्ज्ञांचं सकारात्मक म्हणणं आहे. सध्या कंपनीच्या स्टॉकमध्ये 2 टक्क्यांची घट दिसत आहे. यावर्षी आतापर्यंत शेअरमध्ये 32 टक्क्यांची घसरण झाली आहे. जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत शेअरमध्ये 3 टक्क्यांची घट दिसून आली आहे. दुसऱ्या तिमाहित जवळपास 6 कोटींचं नुकसान झालं आहे. असं असताना रेवेन्यू 4.7 टक्क्यांनी वाढला आहे. यावरून इक्विटी रिसर्च फर्म नुवामा वेल्थ मॅनेजमेंटनं भविष्याचा अंदाज बांधला आहे. रिसर्च फर्मच्या मते, कंपनीसाठी अडचणीचा काळ आहे आणि पुढच्या काळात शेअर चांगली कामगिरी करेल. 


Voltas च्या शेअरमध्ये किती टक्क्यांची वाढ होईल?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इक्विटी रिसर्च फर्म नुवामाने केलेल्या अंदाजानुसार या शेअरमध्ये 31 टक्क्यांची वाढ होईल. त्यामुळे हा शेअर विकत घेण्याचा सल्ला या फर्मनं दिला आहे. 12 महिन्यासाठी टारगेट प्राइस 1130 रुपये आहे. 3 नोव्हेंबरला हा स्टॉक 861 रुपयांवर बंद झाला होता. पुढच्या चार महिन्यात 31 टक्के वाढ अपेक्षित आहे. एनएसईवर व्होल्टासने 7 एप्रिल 2022ला 52 आठवड्यांतील सर्वात जास्त म्हणजेच 1347.65 रुपयांची नोंद केली होती. सध्या या शेअरमध्ये 32 टक्क्यांची घसरण आहे.


Post Office: कुठली गुंतवणूक फायद्याची ठरणार एमआयएस की आरडी? जाणून घ्या


Voltas बाबत ब्रोकरेजचं मत काय?


नुवामा वेल्थच्या मते व्होल्टासनं आतापर्यंत अपेक्षेनुसार विक्री केली आहे. या सेगमेंटमध्ये चांगली वाढ नोंदवली आहे. तीन वर्षांचा CAGR पाहिला असता पहिल्या सहामाहीत 12 टक्क्यांची ग्रोथ आहे.  इन्व्हेंटरी कॉस्ट आणि वाढलेली स्पर्धा यामुळे एबिटा मार्जिन कमी होते. वाढती स्पर्धा असूनही मार्जिन आणि मार्केट शेअर यांच्यातील समतोल राखला आहे.


(Disclaimer: या स्टॉकमध्ये गुंतवणुकीचा सल्ला ब्रोकरेज हाउसने दिला आहे. याचा ZEE 24 TAAS शी काही संबंध नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)