टाटा मोटर्सने लॉंन्च केले टियागोचे नवे मॉडेल !
भारताची आघाडीची वाहन कंपनी टाटा मोटर्स यांनी हॅचबॅक कार टियागोच्या नव्या मॉडलचे लॉंन्च केले. या नव्या मॉडलची किंमत ४.७९ लाख रुपये आहे. यात ऑटोमेटेड मॅनीक्युअल ट्रांसमिशन (एएमटी) ही सुविधा देखील आहे.
नवी दिल्ली : भारताची आघाडीची वाहन कंपनी टाटा मोटर्स यांनी हॅचबॅक कार टियागोच्या नव्या मॉडलचे लॉंन्च केले. या नव्या मॉडलची किंमत ४.७९ लाख रुपये आहे. यात ऑटोमेटेड मॅनीक्युअल ट्रांसमिशन (एएमटी) ही सुविधा देखील आहे.
कंपनीने सांगितले की, "एएमटी ची सुविधा ग्राहकांपर्यंत निश्चितपणे पोहचण्यासाठी टाटा मोटर्सने एएमटीचे नवे मॉडल एक्सटीए फक्त ४.७९ लाखांना उपलब्ध केले आहे.
टाटा मोटर्सचे मार्केटींग पेसेंजर व्हेहिकल व्यापार युनिटचे हेड विवेक श्रीवास्तव यांनी सांगितले की, "आम्ही टियागो एक्सटीए आकर्षक दरात उपलब्ध केली आहे. ग्राहकांच्या वाढलेल्या मागण्या पूर्ण करण्याच्या उद्देशाने हे मॉडल बनवण्यात आले आहे." गाडीत अधिक सामान असताना देखील गाडीची गती उत्तम असेल. आणि पार्कींगच्या वेळेस गाडी चालवणे सोपे होईल.