चांद्रयान-3 चं TATA कनेक्शन माहितीये का? वाचून तुम्हालाही वाटेल अभिमान
Tata Steel Chandrayan 3: टाटा स्टीलकडून (Tata Steel) तयार करण्यात आलेल्या क्रेनने सतीश धवन स्पेस सेंटरमध्ये लॉन्च वाहन LVM3 M4 (Fat Boy) असेंबल करण्यास महत्त्वाची भूमिका निभावली. या अत्याधुनिक इलेक्ट्रिक ओव्हरहेड ट्रॅव्हलिंग (EOT) क्रेनला जमशेदपूरच्या टाटा ग्रोथ शॉपमध्ये तयार करण्यात आलं.
Tata Steel Chandrayan 3: सर्व भारतीयांचं लक्ष लागून असलेली चांद्रयान-3 मोहिम सध्या यशस्वीपणे उड्डाण करत आहे. चांद्रयान-3 ने जमिनीवरुन झेप घेत चंद्राच्या दिशेने प्रवास सुरु केला आहे. भारताच्या या यशस्वी मोहिमेची सध्या जगभरात चर्चा सुरु आहे. पण ही मोहिम यशस्वी करण्यात फक्त इस्त्रो नाही तर देशातील अनेक खासगी कंपन्यांनी मोलाचं योगदान दिलं. यामध्ये देशातील सर्वात जुन्या कंपन्यांपैकी असणाऱ्या टाटा ग्रुपची कंपनीने टाटा स्टीलही आहे. चांद्रयान-3 ला अवकाशात पोहोचवणाऱ्या रॉकेटला लाँच करण्यासाठी ज्या क्रेनचा वापर करण्यात आला, ती क्रेन टाटाच्या फॅक्टरीत तयार करण्यात आली.
टाटाने तयार केली लॉन्चमध्ये वापरण्यात आलेली क्रेन
टाटा स्टीलकडून (Tata Steel) तयार करण्यात आलेल्या क्रेनने सतीश धवन स्पेस सेंटरमध्ये लॉन्च वाहन LVM3 M4 (Fat Boy) असेंबल करण्यास महत्त्वाची भूमिका निभावली. या अत्याधुनिक इलेक्ट्रिक ओव्हरहेड ट्रॅव्हलिंग (EOT) क्रेनला जमशेदपूरच्या टाटा ग्रोथ शॉपमध्ये तयार करण्यात आलं.
टाटा स्टीलकडून चांद्रयान-3 च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर इस्त्रोला शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी त्यांनी टाटा स्टीलकडून तयार करण्यात आलेली क्रेनने (Crane) आंध्रप्रदेशातील सतीश धवन स्पेस सेंटरमध्ये लॉन्च वाहन LVM3 M4 (Fat Boy) ला असेंबल करण्यात महत्त्वाची भूमिका निभावली याचा आनंद आहे असं म्हटलं आहे. बुधवारी कंपनीकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात या मदतीचा उल्लेख करण्यात आला आहे. जमशेदपूरच्या टाटा ग्रोथ शॉपमध्ये या क्रेनची निर्मिती करण्यात आली.
14 जुलैला चांद्रयान-3चं प्रक्षेपण
14 जुलै 2023 ला इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायजेशनने (ISRO) चांद्रयान-3 चं प्रक्षेपण केलं. रांचीमधील हेवी इंजिनिअरिंग कॉर्पोरेशनने चांद्रयानचे इतर महत्त्वाचे भाग तयार केले होते. तर गोदरेज ग्रुपची कंपनी गोदरेज एअरोस्पेसचंही मोठं योगदान दिलं आहे. तसंच टाटा स्टीलने जमशेदपूरमधील फॅक्टरीत तयार केलेल्या अत्याधुनिक क्रेनने या मोहिमेत मोलाचं योगदान दिलं, ते म्हणजे इलेक्ट्रिक ओव्हरहेड ट्रॅव्हलिंग क्रेन. ही क्रेन तयार करण्यात आल्यानंतर लाँचिंगआधी आंध्रप्रदेशच्या श्रीहरीकोटामधील सतीश धवन स्पेस सेंटरमध्ये स्थापित करण्यात आलं.
टाटा स्टीलची स्थापना कधी झाली?
टाटा समूहाची कंपनी टाटा स्टीलने आपल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, चांद्रयान-3 लाँचिंगमध्ये दिलेल्या योगदानाद्वारे आम्ही भारताच्या तंत्रज्ञानातील प्रगती आणि विकासाला चालना देण्याच्या आमच्या वचनबद्धतेची पुष्टी करतो. जमशेदपूरमधील टाटा स्टील प्लांट स्वातंत्र्याआधी सुरु झाला होता. आधी त्याला टिस्को नावान ओळखलं जात होतं. 1907 मध्ये भारतातील पहिला लोखंड आणि पोलाद कारखाना म्हणून त्याची सुरुवात झाली होती. जमशेदपूरमधील लोक त्याला टाटा नगर म्हणूनही ओळखायचे. या कारखान्यात Steel-Iron ची निर्मिती 1912 मध्ये झाली.