कोरोनाकाळात TCSच्या CEOचा पगार एवढा वाढला.. तुम्हाला धक्का बसेल
भारतातच काय तर इतर देशातही कोट्यवधी लोकांच्या नोकऱ्या गेल्या. तर ज्यांच्या नोकऱ्या आहेत त्यांना अर्ध्या पगारावर आपले घर चालवावे लागले.
मुंबई : कोरोना काळात संक्रमण रोखण्यासाठी सरकारने शेवटचा पर्याय म्हणून लॉकडाऊन लावला. त्यानंतर भारतातच काय तर इतर देशातही कोट्यवधी लोकांच्या नोकऱ्या गेल्या. तर ज्यांच्या नोकऱ्या आहेत त्यांना अर्ध्या पगारावर आपले घर चालवावे लागले. तर काही लोकांना दोन तीन महिने त्यांचा पगार मिळालाच नाही. त्यातच भाजीपाल्या सह अनेक जीवनावशक वस्तु ही महागल्या, त्यामुळे लोकांना आता आपले घर चालवणे कठीण झाले आहे. परंतु लोकांना आहे ती नोकरी टिकवून ठेवणे कठीण झाले आहे, त्यात त्यांना पगार वाढीचा विचार करणे शक्यच नाही.
परंतु या कठीण काळात, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आणि व्यवस्थापकीय संचालक राजेश गोपीनाथन यांच्या पगारामध्ये यावेळी कोट्यवधी रुपयांची वाढ झाली आहे. कंपनीच्या वार्षिक अहवालानुसार सन 2020-21 या आर्थिक वर्षात त्यांना 20 कोटी 36 लाख रुपयांचे वार्षिक उत्पन्न मिळाले आहे.
TCSच्या वार्षिक अहवालानुसार, गोपीनाथन यांना रूपये 1 कोटी 27 लाख मासिक पगार मिळाला आहे. याशिवाय त्यात 2. कोटी 09 लाख रुपयांचा भत्ता आणि इतर सुविधांचा समावेश आहे. याशिवाय त्यांना कमिशन म्हणून 17 कोटी रुपये मिळाले आहेत. यापूर्वी सन 2019-20 मध्ये गोपीनाथन यांना एकूण 13 कोटी 3 लाख रुपयांचे पॅकेज मिळाले होते.
कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार गेल्या आर्थिक वर्षात संसाधनांचे संवर्धन करण्यासाठी त्यांचे मानधन कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे मागील वर्षी कंपनीच्या मुख्य अधिकाऱ्यांच्या पगारामध्ये 15 टक्क्यांची कपात करण्यात आली आहे. म्हणून, TCS FY21 च्या वार्षिक अहवालात असे म्हटले आहे की, या आर्थिक वर्षाच्या मोबदल्याची तुलना TCS FY20 बरोबर केली जाऊ नये.
TCSच्या सीईओचे आतापर्यंतचे पॅकेज किती?
गोपीनाथन यांच्या आधी टीसीएसचे मुख्य कार्यकारी अधिकारी एन. गणपती सुब्रमण्यम यांना गेल्या आर्थिक वर्षात 16.1 कोटी रुपयांचे वेतन पॅकेज प्राप्त झाले होते. याचा मासिक पगार 1 कोटी 21 लाख रुपये होता.
भत्ता आणि इतर सुविधांसाठी त्यांना 1 कोटी 88 लाख रुपये देण्यात येत होते. याशिवाय कमिशन म्हणून त्यांना 13 कोटी रुपये मिळायचे. अहवालानुसार, टीसीएसच्या व्यवस्थापन वर्गाचे बक्षीस मागील आर्थिक वर्षात 55.2 टक्क्यांनी वाढले आहे.