नवी दिल्ली : आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीवरून एनडीएतून बाहेर पडलेल्या टीडीपीनं पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य करण्याची एकही संधी सोडलेली नाही. त्याचाच प्रत्यय आज अधिवेशनात पुन्हा आला. टीडीपीचे खासदार नारामल्ली शिवप्रसाद संसदेत हिटलरच्या वेशात आले. मोदी सरकारचा विरोध करण्यासाठी शिवप्रसाद यांनी हिटलरचा पेहराव केला होता. खाकी शर्ट, दंडावर स्वस्तिक आणि हेल हिटलर म्हणत शिवप्रसाद यांनी समोर असलेल्या खासदारांना सॅल्यूट केला. त्यांचा हे रुप पाहून अनेकांना धक्का बसला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


याआधी नारदमुनींच्या रुपात संसदेत आलेले टीडीपीचे खासदार गुरुवारी जर्मनीचा तानाशाह हिटलरच्या रुपात पाहायला मिळाले. त्यांनी आपल्या पक्षाच्या मागणीसाठी समर्थन मिळावं यासाठी त्यांनी हा मार्ग अवलंबला. याआधी ते शाळकरी विद्यार्थी आणि साईबाबांच्या वेशात देखील संसदेत पोहोचले होते.