टीडीपीकडून केंद्र सरकारवर अविश्वास प्रस्ताव आणण्याच्या हालचाली
एनडीएचा घटक पक्ष असलेल्या चंद्राबाबूंच्या टीडीपीनं मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. विशेष म्हणजे टीडीपीच्या या प्रस्तावाला काँग्रेसनंही संधी साधत पाठिंबा दिलाय.
नवी दिल्ली : एनडीएचा घटक पक्ष असलेल्या चंद्राबाबूंच्या टीडीपीनं मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. विशेष म्हणजे टीडीपीच्या या प्रस्तावाला काँग्रेसनंही संधी साधत पाठिंबा दिलाय.
इतर घटक पक्ष आणि प्रादेशिक पक्षांशीही टीडीपी चर्चा करणार
आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्यासाठी वायएसआर काँग्रेसनं मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याबाबत कालच वक्तव्य केलं होतं. त्यांच्यावर कुरघोडी करण्यासाठी टीडीपीनं जोरदार हालचाली सुरू केल्या. इतर घटक पक्ष आणि प्रादेशिक पक्षांशीही टीडीपी चर्चा करणार असल्याचं समजतंय.
टीडीपीच्या पॉलिट ब्युरो बैठकीत निर्णय
अखेर तेलुगू देसम पार्टी एनडीएतून बाहेर पडलीय....टीडीपीच्या पॉलिट ब्युरो बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. टीडीपी संसदेत सरकारविरोधात अविश्वास प्रस्तावही आणणार आहे. आंध्र प्रदेशला विशेष दर्जा द्या, अशी टीडीपीची मागणी होती. केंद्र सरकार आंध्र प्रदेशला विशेष दर्जा द्यायला तयार नव्हतं.
तेलुगू देसम पक्षाचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू नाराज
या मुद्द्यावरुन तेलुगू देसम पक्षाचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू नाराज होते. काही दिवसांपूर्वीच टीडीपीचे केंद्रीय मंत्री अशोक गजपती राजू आणि वाय एस चौधरी यांनी राजीनामा दिला होता. टीडीपीचे 16 खासदार आहेत....सध्या भाजप खासदारांची संख्या 273 म्हणजे काठावर पास एवढी आहे.