ब्युरो रिपोर्ट, कोरिया, छत्तीसगड : चहा (Tea) ही अनेकांची आवड. पण आवडला म्हणून कुणी आयुष्यभर चहाच पित बसत नाही. मात्र एक काकू अशा आहेत, की ज्या केवळ चहाच पितात. (Chai Wali Chachi Only Takes Tea Since Last 33 Years) या अजब सवयीने त्यांनी डॉक्टरांनाही बुचकळ्यात टाकले आहे. वाफाळलेला चहा हा विकपॉइंट आहे, दिवसातून अनेकदा 'कटिंग' लागतोच, कितीही कप चहा घेऊन काही होत नाही, ही वाक्यं अनेक जण अनेकदा उच्चारत असतात. पण एखादी व्यक्ती फक्त चहा पिऊन तब्बल 33 वर्षे ठणठणीत राहू शकते का? डॉक्टर किंवा शास्त्रज्ञांना विचाराल, तर याचं उत्तर ते 'नाही' असंच देतील पण. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही चहा पिणारी काकू आहे छत्तीसगडमधील (Chhattisgarh village) पल्लीदेवी.(Pilli Devi) कोरिया (Koriya) जिल्ह्यातील बदरिया या लहानशा गावात राहणाऱ्या. गेली 33 वर्ष त्या केवळ चहा पिऊन जिवंत आहेत. नुसत्या जिवंतच नाही तर दैनंदिन व्यवहार करत आहेत. गेल्या 33 वर्षांत अन्नाचा एक कणही त्यांच्या पोटात गेलेला नाही. गावात त्या 'चायवाली चाची' म्हणून ओळखल्या जातात. 


1985 मध्ये त्याचे लग्न झाले. त्यानंतर त्या पहिल्यांदा माहेरी आल्या, त्या परत गेल्याच नाहीत. पल्लीदेवींनी सातवीत असल्यापासूनच जेवण सोडल्याचं त्यांचे वडील रतिराम यांनी सांगितलं. समजायला लागल्यापासून त्यांच्या भावानं पल्लीदेवींना फक्त चहा पितानाच पाहिले. 


दूधवाल्यासोबत भांडण झाल्यानंतर पल्लीदेवी फक्त कोरा चहा पितात. तरीही त्यांना कोणताही आजार नाही. प्रकृती एकदम ठणठणीत आहे. पल्लीदेवींच्या या अजब गुणामुळे डॉक्टरही हैराण आहेत. 



फक्त चहा पिण्यामागे काही विशेष कारण नाही. भूकच लागत नसल्यामुळे जेवत नसल्याचे पल्लीदेवी सांगतात. दिवस मावळल्यानंतर चहा पितात. त्यांना याचं काहीच विशेष वाटत नसलं तरी पंचक्रोशीत त्यांच्या या नवलाईची चर्चा आहे.