झाबुआ :  एका सरकारी शाळेत १२ वर्षीय विद्यार्थिनीने गृहपाठ न केल्याने शिक्षकाने अमानुषपणे शिक्षा दिल्याची घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशातील आदिवासी बहुल झाबुआ जिल्हातील ही घटना आहे.


६ दिवस सतत १२ वर्षीय मुलीला मारहाण


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गृहपाठ न केल्याने सहावीच्या वर्गातील मुलींकडून ६ दिवस सतत या १२ वर्षीय मुलीला, १६८ वेळा थोबाडीत मारण्यात आल्या. या विषय़ी  विद्यार्थीनी अनुष्का हिच्या वडिलांनी शाळेतील मुख्याध्यापकांकडे तक्रार केली आहे. 


तिने आदल्या दिवशी गृहपाठ न केल्याने... 


अनुष्काची तब्येत बरी नव्हती, तेव्हा तिने आदल्या दिवशी गृहपाठ न केल्याने, तिला विज्ञान विषयाचे शिक्षक मनोज कुमार वर्मा यांनी अनुष्काच्या गालावर, तिच्याच वर्गातील १४ मुलींना ,११ ते १६ जानेवारी म्हणजेच सतत ६ दिवस रोज २-२ थोबाडीत मारायला सांगितल्या. 


मारहाणीमुळे अनुष्काला मानसिक धक्का


या मारहाणीमुळे अनुष्काला मानसिक आणि शारीरिक धक्का बसला असून ती पुन्हा आजारी पडली. शिक्षकाच्या या कृत्यामुळे अनुष्का घाबरली असून तिला शाळेत जायलाही भीती वाटते आहे. अनुष्कावर थांदलाच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. अनुष्काच्या वडिलांनी ही संपूर्ण माहिती दिली आहे. 


मेडिकल तपासात मुलीला जखम झाल्याचं आढळून आलं नाही. पण तिच्या वर्गातील मुलींनी या घटनेला दुजोरा दिला असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.