कराईकल : देशभरात आज 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा (Teachers Day 2022) करण्यात येत आहे. या दिनानिमित्त शाळेत शिक्षकांचा गौरव होत असतानाचं एक दुदैवी घटना समोर आली आहे. शिक्षकदिनीच शिक्षकाच्या प्रिय असलेल्या विद्यार्थ्याची हत्या (Student Killed) केल्याची घटना घडली. या घटनेने एकचं खळबळ माजली आहे.   


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशभरात आज शिक्षक दिन (Teachers Day 2022) साजरा होत असतानाचं एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका विद्यार्थ्यांची हत्या  (Student Killed)करण्यात आली आहे. विद्यार्थी वर्गात टॉप येत असल्याचा राग मनात धरून त्याची हत्या करण्यात आली. विद्यार्थ्याच्या मैत्रिणीच्या आईनेच त्याला ठार करण्याचा कट रचला होता. या कटात ती यशस्वी झाली. पुद्दुचेरीच्या कराईकल येथील नेहरू नगर मधील एका खासगी शाळेत ही घटना घडलीय.  


'या' कारणामुळे आईने उचलंल मोठं पाऊल
मैत्रिणीच्या आईने स्पर्धेच्या या खेळात इयत्ता आठवीत शिकणाऱ्या तिच्या वर्गमित्राची हत्या (Student Killed) केली. बालनिकंदम नावाच्या विद्यार्थ्याला मुलाच्या आईने विष देऊन ठार केले. हा विद्यार्थी नेहमीच टॉप करतो आणि आपली मुलगी मागे राहते, याचा तिला राग यायचा. 


असा रचला हत्येचा कट
या महिलेने शुक्रवारी मुलांच्या शाळेत पोहोचून तेथील वॉचमनला (watchman) बालनिकंदम यांची आई असल्याचे सांगत दोन कोल्ड्रीक्सच्या (Coldrinks)   बाटल्या वॉचमनला दिल्या आणि आपल्या मुलाला देण्यास सांगितले. वॉचमनला विद्यार्थी सापडल्यावर त्याने कोल्ड्रीक्सच्या (Coldrinks)   बाटल्या त्याला दिल्या. विद्यार्थ्याने ते प्यायल्यानंतर त्याची प्रकृती खालावली.


घरी पोहोचताच विद्यार्थ्याला उलट्या होऊ लागल्या. यानंतर मुलाच्या पालकांनी त्याला दवाखान्यात नेले आणि उपचारानंतर त्याला घरी आणले. मात्र त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. शनिवारी पुन्हा आजारी पडल्याने त्यांना रात्री शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे त्यांचा मृत्यू झाला. 


दरम्यान मृत्यूपूर्वी मुलाने आई-वडिलांना सांगितले होते की, त्याने शाळेच्या वॉचमनने (watchman) दिलेले कोल्ड्रीक्स (Coldrinks)  प्यायले होते. या प्रकरणावर एसएसपी लोकेश्वर म्हणाले की, पोलिसांनी तत्काळ या प्रकरणाचा तपास सुरू केला असता सग्याराणी नावाच्या महिलेने कोल्ड्रीक्समध्ये विष मिसळल्याचे आढळून आले. सध्या महिलेला अटक करण्यात आली आहे. तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.