SmartPhone Users : हल्ला स्मार्टफोनचा (Smartphone) जमाना आहे, प्रत्येकाकडे मोठमोठ्या आकाराचे अँड्ऱॉईड (Android) विंडोज फोन दिसतात. स्मार्टफोनमुळे सर्वगोष्टी घरबसल्या होऊ लागल्या आहेत. अगदी जेवणापासून कपड्यांपर्यंत प्रत्येक गोष्ट घरबसल्या ऑनलाईन ऑर्डर (Online Order) करता येते. शालेय विद्यार्थ्यांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहेत. स्मार्टफोनमुळे आपलं आयुष्य जितकं स्मार्ट झालं आहे, पण जर याचा योग्य वापर केला नाही तर यामुळे आपलं नुकसानही होऊ शकतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुम्ही फोन कोणत्या खिशात ठेवता?
अनेकांना फोन खिशात ठेवायची सवय असते. काही जणं शर्टच्या खिशात (Pocket) फोन ठेवतात. तर काही जणांना पँटच्या पुढच्या खिशात फोन ठेवण्याची सवय असते. पण अशी सवय तुम्हाला महागात पडू शकते. फोनमधून बाहेर पडणाऱ्या रेडिएशन्समुळे (Radiation) आपल्या शरीराला नुकसान पोहोचू शकतं. शर्टाच्या खिशात मोबाईल ठेवल्याने ह्रदयाचे विकार होण्याची भीती वाढू शकते. तर पँटच्या पुढच्या खिशात मोबाईल ठेवल्याने शुक्राणूंवर परिणाम होऊन नपुंसकता (Impotence) उद्बवण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे तुम्हालाही शर्टच्या किंवा पँटच्या खिशात मोबाईल फोन ठेवण्याची सवय असेल तर आजच ती सवय बदला.


काय होऊ शकतं नुकसान
एका अभ्यासानुसार मोबाईल फोन वायरलेस नेटवर्कशी जोडला गेलेला असताना 10 पटीहुन जास्त रेडिएशन बाहेर पडत असतं. फोन खिशात ठेवलेला असल्याने या रेडिएशनचा थेट शरीरावर परिणाम होऊ शकतो. रेडिएशन कँसरचं एक कारण मानलं जातं. तसंच रेडिएशनमुळे हृदयाचा धोका उद्भवू शकतो, इतकंच नाही तर शरीरातील हाडं ठिसून होऊ शकतात, अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. 


फोन कुठे ठेवावा?
त्यामुळे शरीराच्या कोणत्याही नाजूक भागाजवळ फोन ठेवू नका. फोन शक्यतो आपल्या बॅगेत ठेवावा असा तज्ज्ञ देतात.


मोबाईल टॉयलेटमध्ये घेऊन जाता?
अनेक जणांना टॉयलेटला जाताना फोन घेऊन जाण्याची सवय असते. पण टॉयलेटमध्ये फोन घेऊन जाणं हे तुमच्या आरोग्यासाठी (Health) घातक ठरू शकतं. टॉयलेट सीट, नळ, फ्लश बटण इत्यादींवर अनेक बॅक्टेरिया असतात. तुम्ही फोनचा वापर करता तेव्हा फोनच्या स्क्रीनवर बॅक्टेरिया पसरु शकतात. तुम्ही टॉयलेटमधून बाहेर आल्यानंतर हात धुवू शकता, पण नळाखाली फोन धुवू शकत नाहीत. त्यामुळे बॅक्टेरिया फोनवर राहतात आणि नंतर हाताद्वारे शरीरात जातात, जे तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे.