मुंबई : Bitcoin एक अशी Cyrpto Currency ज्याने अनेक लोकांना एका रात्रीत मालामाल बनवलं आहे. आता एका Bitcoin ची किंमत 50 लाख रुपयांच्या आसबास आहे. Bitcoin ने ज्या लोकांची किस्मत बदलली त्यामध्ये एरिक फिनमॅन देखील आहे. फिनमॅनच म्हणणं आहे की, Bitcoin मुळे तो कोट्याधिश झाला आहे. ते अगदी कमी वयात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या 10 वर्षात, एरिक फिनमॅनच्या सुमारे 100 बिटकॉइन होल्डिंगचे मूल्य आता 50 कोटी रुपयांच्या जवळ पोहोचले आहे. या १०० बिटकॉइन्सना एरिकने २०११ मध्ये खरेदी केले होते. त्यावेळी एरिकने एक हजार डॉलर म्हणजे 47 हजार रुपयामध्ये खरेदी केलं आहे. ज्यावेळी एरिकने Bitcoin खरेदी केलं होतं. तेव्हा त्याच वय अवघ 12 वर्षे होतं. 



एरिक फिनमॅनने 12 वर्षांच्या वयात आपली पहिली गुंतवणूक केली आहे. 18 व्या वर्षी तो करोडपती झाला. 18 व्या वर्षी त्याने एक प्रतियोगी क्रिप्टोकरेंसीमध्ये गुंतवणूक केलं आहे. इडाहो मधून सिलिकॉन व्हॅली क्रिप्टो-करोडपती पर्यंतचा प्रवास करणाऱ्या एरिक फिनमनबाबत समजून घेऊया. 2011 मध्ये, वयाच्या 12 व्या वर्षी, आयडाहो दरम्यान एरिक फिनमनने $ 10 किमतीचे बिटकॉइन खरेदी केले. वयाच्या 15 व्या वर्षी एरिकला शाळेतून काढून टाकण्यात आले. यानंतर त्याने आणखी 100 Bitcion खरेदी केले.


वयाच्या 17 व्या वर्षी, एरिक फिनमॅनने बोटॅंगल विकले आणि 18 व्या वर्षी बिटकॉइन करोडपतीचा दर्जा मिळवला. वयाच्या 19 व्या वर्षी एरिकचे खरे आयुष्य बदलले. वयाच्या 20 व्या वर्षी सॅटेलाइट लाँच केलं. 2021 मध्ये, बिटकॉईन करोडपती एरिक फिनमनने स्वतःचा स्मार्टफोन बाजारात आणला आहे.  ज्याला फ्रीडम फोन म्हणतात. हा एक नवा फोन आहे. जो पूर्णपणे सेंसर शिवाय असल्याचा दावा केला आहे. फ्री स्पीच आणि प्रायव्हसी फर्स्ट अशी टॅग लाईन आहे.