पटना : बिहारच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या घडामोडी घडत आहते. राष्ट्रीय जनता दल प्रमुख लालू प्रसाद यादव यांची मुले तेजप्रताप यादव आणि तेजस्वी यादव यांच्यात तणावपूर्ण वातावरण आहे. लालू प्रसाद यादव यांचा मोठा मुलगा आणि बिहारचे माजी आरोग्य मंत्री तेजप्रताप यादव यांनी मनासारखी उमेदवारी न मिळाल्याने बंडखोरी करण्यास सुरूवात केली आहे. या दरम्यान तेजप्रताप यादव यांना मंगळवारी फोनवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तेजप्रताप यादव यांना एका अज्ञात फोनवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. त्यांनी याप्रकरणी पटनातील पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. या धमकी प्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून कॉल रेकॉर्डचाही तपास करत आहेत. तेजप्रताप यादव यांच्या स्वीय सहाय्यकालाही मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या घटनेने बिहारच्या राजकारणात मोठी चर्चा सुरु झाली आहे. 


 लोकसभा निवडणूक २०१९ मध्ये बिहारच्या २० जागांवर तेजप्रताप यादवने उमेदवार उभे करण्याची घोषणा केली आहे. शिवहर आणि जहानाबाद येथील जागांसाठी उमेदवारांची मागणी करण्यात आली होती. परंतु यावर निर्णय न झाल्याने आता तेजप्रताप यादवने बंडखोरी करण्यास सुरूवात केली आहे. तेजप्रताप यादवने आरजेडीमध्येच 'लालू-राबडी मोर्चा'ची घोषणा केली आहे. तसेच २० जागांवर उमेदवार उभे करण्याचेही बोलण्यात येत आहे.