सरकारी रुग्णालय की बार... हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या बेडवर नर्सची दारू पार्टी, व्हायरल Video ने एकच खळबळ
सरकारी प्रसूती रुग्णालयात हा सर्व प्रकार सुरु होता
शासकीय रुग्णालयातील (Hospital) महिला कर्मचाऱ्यांच्या दारू पार्टी (liquor Party) करतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. रुग्णालयातील या प्रकारामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. हा व्हिडीओ तेलंगणातील (telangana) हनमकोंडा जिल्ह्यातील असल्याचे समोर आलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये रुग्णालयातील महिला कर्मचारी दारू (liquor) पिताना दिसत आहे. हा व्हिडिओ जिल्ह्यातील शासकीय प्रसूती रुग्णालयाचा आहे. (telangana nurse liquor Party sitting on bed in government hospital video viral)
माध्यमांच्या वृत्तानुसार, रुग्णाच्या (patient) नातेवाईकाने व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे. यामध्ये तीन महिला मद्यपान (liquor Party) करताना दिसत आहेत. या तीन महिला रुग्णालयातील (Hospital) कर्मचारी असल्याचे सांगण्यात येत आहे. रुग्णाच्या बेडवर दोन महिला बसल्या आहेत आणि तिसरी महिला उभी आहे. या महिला चौथ्या व्यक्तीशी बोलत आहेत.
इतर रुग्णांनीही रुग्णालयातील कर्मचाऱ्यांविरोधात तक्रारी केल्या आहेत. रुग्णांची काळजी घेण्याऐवजी रुग्णालयातील वाढदिवस साजरा करण्यात कर्मचारी मग्न असल्याचा आरोप रुग्णांनी केला आहे. रुग्णालयाच्या आवारात वाढदिवस साजरा करत दारुची पार्टी करण्यात आल्याचे रुग्णांचे म्हणणे आहे. त्यामुळे रुग्णांची काळजी घेतली जात नसल्याची तक्रार करण्यात आली आहे.
दारू पार्टी करताना आढळलेल्यांमध्ये नर्स/मिडवाइफ, आरोग्यश्री वर्कर, स्टाफ नर्स आणि दोन बाहेरील लोकांचा समावेश असल्याचे समोर आले आहे. त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे. याबाबत रुग्णांच्या नातेवाइकांनी संताप व्यक्त करत प्रशासनाने लवकरात लवकर कारवाई करावी, असे म्हटले आहे. हे पाहून इंटरनेट युजर्सही हैराण झाले आहेत. सरकारी रुग्णालयाची ही अवस्था असल्याचे काही लोकांचे म्हणणे आहे.
दरम्यान, तेलंगणातील रुग्णालयांमध्ये निष्काळजीपणाची अनेक उदाहरणे समोर आली आहेत. तेलंगणातील वारंगल येथील एमजीएम रुग्णालयातील जनरल वॉर्डमध्ये रुग्णाच्या पलंगाखाली असलेल्या चक्क साप आढळून आला होता. त्यानंतर अनेक प्रयत्नानंतर सापाला पकडण्यात आले