तेलंगणा पोलिसांचा `तो` व्हिडीओ व्हायरल!
तेलंगणा पोलिसांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
नवी दिल्ली : तेलंगणा पोलिसांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या व्हिडीओयत एक पोलीस अधिकारी महिला होमगार्डकडून मसाज करून घेत आहे. हा व्हिडीओ ४-६ महिने जुना असल्याचे बोलले जात आहे. तसंच हा व्हिडीओ आर्म्ड हेडक्वार्टर मध्ये शूट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ तेलंगणातील जोगुलंबा-गड़वाल जिह्ल्यातील असून याप्रकरणी पोलिसांना तपासणीचे आदेश देण्यात आले आहेत.
व्हिडिओमधील पोलीस हे असिस्टेंट सब-इंस्पेक्टर असून त्यांची सेवा महिला होमगार्ड करत आहेत.
व्हिडीओ मध्ये एएसआय एका बाकड्यावर झोपले आहेत आणि महिला त्यांची पाठ दाबत आहे. पाठ दाबल्यामुळे त्यांना इतका आराम मिळालाय की व्हिडीओच्या शेवटी ते झोपलेले दिसत आहेत.
याप्रकरणी मीडियाने हस्तक्षेप केल्यानंतर पोलीस जिल्हाधिकक्षक एमएस विजय कुमार यांनी या व्हिडीओ संदर्भात तपासणीचे आदेश दिले आहेत. याप्रकणी सहाय्यक सब इन्स्पेक्टर यांना पाठदुखी असल्यामुळे त्यांनी होमगार्ड महिलेला पाठ दाबण्याची विनंती केली आणि त्या महिलेने स्वखुशीने हे काम केले. असे स्पष्टीकरण देण्यात आले. मात्र विजय कुमार यांनी सांगितले की, अशा प्रकारच्या घटना खपवून घेतल्या जाणार नाहीत आणि त्यांच्यावर आवश्यकतेनुसार कारवाई केली जाईल.