नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत वृद्धांची सुरक्षा वाऱ्यावर असल्यचं चित्र समोर येत आहे. गेल्या ६ महिन्यांमध्ये दिल्लीत ग्रेटर कैलास परिसरात दोन वृद्धांचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. दिल्ली पोलिस त्यांना वाचविण्यात अपयशी ठरले. तर आता संपत्तीच्या वादातून अरूण कुमार शर्मा यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही घटना कैलास कॉलनी परिसरातील एच-ब्लॉकच्या घर क्रमांक १५ मधील आहे. संपत्तीच्या वादामुळे उद्योगपती अरूण कुमार शर्मा यांना एका गाडीत टाकून अपहरण केले. त्यानंतर त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. १५ नोव्हेंबर २०१९ मध्ये त्यांचं अपहरण झालं. 


ते सकाळी ८च्या सुमारास वकिलांना भेटण्यासाठी गुरूग्रामच्या दिशेने निघाले होते.याचदरम्यान कैलास कॉलनी मेट्रो स्थानकाबाहेर त्यांचे अपहरण करण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी ५ जणांना ताब्यात घेतले आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपी व्यक्तींची ओळख पटली.   


अरूण शर्मा एक प्रसिद्ध उद्योगपती होते. ते टीव्ही तयार करण्याऱ्या 'TELEVISTA' कंपनीचे मालक होते. अरूण शर्मा यांचा मृतदेह मध्यप्रदेशमध्ये अढळून आला.