मुंबई : देशात अनेक ठिकाणी आता उन्हाच्या झळा बसू लागल्या आहेत. महाराष्ट्रातील अकोला (Akola in Maharashtra)  आणि राजस्थानमधील बाडमेर (Barmer of Rajasthan) मध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. येथे 42.9 डिग्री तापमान नोंदवलं गेलं आहे. जे संपूर्ण भारतात (India) बुधवारी सर्वाधिक होते. अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे. (Maharashtra's Akola and Rajasthan's Barmer Districts Record highest Temperatures of 42.9°C )


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रेकॉर्ड ब्रेक तापमान


भारतीय हवामान खात्याने (India Meteorological Department) बुधवारी माहिती दिली की, मध्य प्रदेश (Madhya Pradesh) च्या होशंगाबाद येथे सर्वाधिक तापमान 42.3 डिग्री सेल्सियसची नोंद झाली. राजस्थान (Rajasthan) मधील जैसलमेर येथे 42 डिग्री सेल्सियसची नोंद झाली.


जम्मूमध्ये 35 डिग्री सेल्सियस


जम्मू (Jammu) मध्ये 35 डिग्री सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. शिमला (Shimla) मध्ये 25.1 डिग्री सेल्सियस, तेजपूरमध्ये 36 डिग्री सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे.


आयएमडी (IMD) ने म्हटलं की, जम्मू, पश्चिम राजस्थान आणि गुजरात (Gujarat) च्या अनेक भागात तापमान वाढलं आहे. हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh) आणि उत्तराखंड या राज्यात देखील वेगवेगळ्या भागात तापमान वाढलं आहे. विदर्भ, मध्य प्रदेश आणि ओडिशा मध्ये उन्हाचा तडाखा वाढला आहे.


जम्मू, पश्चिमी राजस्थान, गुजरात, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड (Uttarakhand) तसेच विदर्भ (Vidarbha) आणि मध्य प्रदेशच्या काही भागांमध्ये तापमानात मोठी वाढ झालीये.