Pune Couple Arrest: स्वतः 6 मुलांचा बाप, प्रेयसीला 2 मुलं…; तिला टच केलं म्हणून दिल्लीत डॉक्टरला मारून टाकलं!

नोएडामध्ये एका डॉक्टरच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी भाडेकरुला बेड्या ठोकल्या आहेत. डॉक्टर आपल्या प्रेयसीसह अश्लील कृत्य करत होता त्यामुळे त्याची हत्या केली असं आरोपीचं म्हणणं आहे.
दिल्लीत वास्तव्यास असणाऱ्या डॉक्टरची हत्या करण्यात आल्या प्रकरणी पोलिसांनी भाडेकरुला बेड्या ठोकल्या आहेत. आरोपी भाडेकरुचं म्हणणं आहे की, डॉक्टरने आपल्या प्रेयसीसह अश्लील कृत्य केल्याने त्याची हत्या केली. पोलीस उपायुक्त शक्ती मोहन अवस्थी यांनी सांगितलं की, दिल्लीच्या कुंडली येथील रहिवासी असणारे डॉक्टर दिनेश गौड (50) यांचं ग्रेटर नोएडाच्या कुलेसरा गावातील संजय विहार कॉलनीत घर आहे. 23 जानेवारीला त्यांनी कुशीनगरमधील रहिवासी इम्तियाज (आरोपी) आणि एका महिलेला बंगल्यातील एक रुम भाड्याने दिली होती.
आरोपी करत होता महिलेसह छेडछाड
मोहन अवस्थी यांच्या म्हणण्यानुसार, आरोपी इम्तियाजची चौकशी केली असता त्याने सांगितलं की, 25 जानेवारीच्या रात्री दिनेश दारु पिऊन आला आणि इम्तिजाय व त्याच्या प्रेयसीला खोलीत बोलावलं. आरोपीनुसार, दिनेश काही ना काही कारणाने त्याला थोड्या वेळासाठी बाहेर पाठवत होता. यादरम्यान तो महिलेसह छेडछाड करु लागला.
पोलिसांनी सांगितलं आहे की, आरोपीने दिनेश आपल्या प्रेयसीसह अश्लील कृत्य करत असल्याचं पाहिलं. यानंतर दोघांमध्ये हाणामारी झाली. आरोपीने प्रेयसीला वरच्या खोलीत पाठवलं. यावेळी आरोपीने दिनेशच्या रुममध्ये पडलेल्या हातोड्याने त्याच्यावर एकामागून एक वार केले. दिनेश बेशुद्ध होऊन पडल्यानंतर आरोपीने जवळच पडलेल्या सर्जिकल ब्लेडने त्याच्या पोटावर हल्ला केला.
हत्येनंतर आरोपी प्रेयसीसह झाला फरार
पोलीस उपायुक्त शक्ती मोहन अवस्थी यांनी सांगितलं की, आरोपी हत्येनंतर आपल्या प्रेयसीसह घटनास्थळावरुन फरार झाला होता. आरोपी इम्तियाजला बुधवारी अटक करण्यात आली. कोर्टात हजर करण्यात आलं असता, त्याला 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं.
आरोपीला सहा मुलं
पोलिसांनी सांगितलं की, 44 वर्षीय आरोपीला सहा मुलं आहेत. त्याच्या प्रेयसीचं वय 32 वर्षं असून तिलाही दोन मुलं आहेत. गेल्या दोन वर्षांपासून दोघेही आपल्या कुटुंबापासून वेगळं राहत आहेत. पुण्यात दोघांची भेट झाली होती. तिथे दोघेही ग्रेटर नोएडामध्ये आले आणि एकत्र राहू लागले. दोघेही नोकरीच्या शोधात होते. डॉक्टरने दोघांनाही नोकरी मिळवून देण्यात आश्वासन देण्यात आलं होतं.