नवी दिल्ली : लडाख येथील नियंत्रण रेषेजवळ पॅंगॉग त्सो आणि गालवान घाटीत चीनने सैनिकांची संख्या वाढवली आहे. त्यामुळे भविष्यात भारतीय सैन्यासोबत खटके उडण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. भारतीय सैन्यासोबत सुरु असलेल्या तणावपूर्व वातावरणानंतर चीनी सैन्य मोठ्या प्रमाणात दिसू लागले आहे. गेल्या आठवड्यात १०० नवे तंबू आणि बंकर बनवण्याचे साहित्य सीमारेषेजवळ दिसून आले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आमच्या हद्दीत कोणत्याही प्रकारची घुसखोरी करु देणार नाही तसेच इथली सुरक्षा अधिक काटेकोर करत असल्याचे भारतीय सैन्याने स्पष्ट केले. या जागेवर हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. 



गेले काही दिवस चीनी घुसखोरांचा भारतीय सैन्याशी सामना होत आहे. दोन्ही देशांनी आपापल्या सीमारेषेजवळचे सैन्य वाढवले आहे.


हा एक कुटनितीचा भाग असून एका आठवड्यात हे प्रकरण निवळून जाईल अशी माहिती स्थानिक सुत्रांनी दिली आहे.


उन्हाळा सुरु झाला की चीनी सैन्य पुढे सरसावते. भारतीय सैन्याने त्यांना परतवून लावले आहे. हे दरवर्षीच होत असल्याचेही सुत्रांनी सांगितले.