मुंबई : दहशतवाद्यांनी पुन्हा भ्याड कृत्य केले आहे. जम्मू-काश्मीरच्या (Jammu and Kashmir) सोपोरेमध्ये मोठा दहशतवादी हल्ला (Terrorist Attack ) करण्यात आला आहे. (Terrorist Attack on CRPF and police team in Jammu and Kashmir) दहशतवाद्यांनी सीआरपीएफ आणि पोलीस पथकावर हा हल्ला केला आहे. या हल्ल्यात भारतीय लष्कराचे दोन जवान शहीद झाले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जम्मू-काश्मीरमधील Sopore भागात दहशतवाद्यांनी लष्कर आणि पोलीस टीमला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला आहे. दहशतवाद्यांनी पुन्हा डोके वर काढण्याचा प्रयत्न करताना हा हल्ला घडवून आणला आहे. या दहशतवादी हल्ल्यात दोन जवान शहीद झाल्याची माहिती आहे. सुरक्षा दलांने सोपोरे परिसराला घेराव घालून प्रत्युत्तरादाखल कारवाई सुरू केली आहे.या घटनेत दोन सैनिक शहीद झाले आहेत तर दोन नागरिकही गंभीर जखमी झाले आहेत.


हा दहशतवादी हल्ला जम्मू-काश्मीर पोलिस आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकावर सोपोरेच्या अरमपुरा येथे एका चौकीवर करण्यात आला. हल्ल्यानंतर जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.


काश्मीरचे आयजी विजय कुमार म्हणाले की, सोपोरेमध्ये झालेल्या हल्ल्यात दोन पोलीस शहीद झाले. त्याचवेळी या हल्ल्यात दोन नागरिकांचा मृत्यूही झाला. या हल्ल्यात अन्य दोन पोलीसही जखमी झाले आहेत. या हल्ल्यामागे लष्कर-ए-तैयबाचा हात असल्याचे सांगितले जात आहे.