श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांनी पोलिसांवर हल्ला केला. (Terrorist Attack On Police In Srinagar) यावेळी दहशतवाद्यांनी पोलिसांवर जोरदार गोळीबार केला. दहशतवाद्यांच्या या हल्ल्यात दोन पोलीस कर्मचारी शहीद (Two Policemen Martyred In Srinagar) झाले आहेत. हल्यानंतर दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी सर्व बाजूने परिसराला वेढा घातला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांनी पोलीस पथकावर हल्ला केला. काश्मीर झोन पोलिसांच्या म्हणण्यानुसार दहशतवाद्यांनी श्रीनगरच्या बारजुला भागात पोलीस पथकावर हा हल्ला केला आहे. दहशतवाद्यांच्या या हल्ल्यात जम्मू-काश्मीर पोलीसच्या दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.


दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या पोलिसांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. मात्र, तिथेच त्यांचा मृत्यू झाला. उपचारादरम्यान पोलीस वाचू शकलेले नाहीत.


हल्यानंतर सुरक्षा दलाने शोधकार्य सुरू केले आहे. श्रीनगर येथे पोलीस पथकावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा दले आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी सर्व बाजूंनी परिसर घेरला आहे. सध्या परिसरात शोध मोहीम राबविली जात आहे. महत्त्वाचे म्हणजे तेथे किती दहशतवादी होते, याची माहिती मिळू शकलेली नाही. पोलीस पथकावर झालेल्या हल्ल्यामागील कोणत्या दहशतवादी संघटनेचा हात आहे आणि त्यांचा हेतू काय होता याचीही माहिती पोलिसांकडून घेतली जात आहे.


दरम्यान, आज सकाळी जम्मू-काश्मीरच्या शोपियां जिल्ह्यात सुरक्षा दलाने (Security Forces) मोठे यश संपादन केले. चकमकीत सुरक्षा दलांने शॉपियन एन्काऊंटरमध्ये लष्कर-ए-तैयबाचे तीन दहशतवादी ठार केलेत. यावेळी जम्मू-काश्मीर पोलीस दलातील एक जवान शहीद झाला. आज शुक्रवारी सकाळी सुरक्षा दल आणि जम्मू-काश्मीरचे पोलीस शोपियांमध्ये शोधमोहीम राबवित होते. यावेळी दहशतवाद्यांनी गोळीबार केला. यावेळी सुरक्षा दलानेही चोख प्रत्युत्तर दिले. त्यानंतर दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार सुरू झाला. लष्कर-ए-तैयबाच्या ठार करण्यात आलेल्या अतिरेक्यांकडून सुरक्षा दलाने एक पिस्तूल आणि दोन एके-47 रायफल जप्त केल्या आहेत.