मुंबई : Terrorist Attack News : दहशतवाद्यांसंदर्भात एक धक्कादायक बातमी. दहशतवाद्यांचा प्लान बी उघड झाला आहे. (Terrorist Plan B ) दरम्यान, पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांचा (Pakistan Terrorist) कट हाणून पाडल्यानंतर या दहशतवाद्यांच्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे. पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा ISIच्या इशाऱ्यावर हे दहशतवादी भारतात मोठा घातपात घडवण्याच्या तयारीत होते. हा कट उघड झाल्यानंतर दुसरा कट तयार होता. या कटानुसार देशाचे आर्थिक नुकसान करण्याचे आदेश दहशतवाद्यांना देण्यात आले होते. तसेच स्फोटात अपयश आल्यास कंपन्या, गोदामे, शोरुम्सला आगी लावण्याचा कट रचण्यात आला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्लीत अटक केलेल्या दहशतवाद्यांचा प्लान बी उघड केला आहे. स्फोट घडवण्यात अपयशी आल्यास देशाचं आर्थिक नुकसान करण्याचे आदेश देण्यात आले होते. मोठे खासगी कारखाने, गोदामे, शोरुम्समध्ये आग लावण्याचा कट आखण्यात आला होता. मस्कतवरुन भाडोत्री ट्रेनर्स घेतल्याचेही केलेल्या तपासात उघड झाले आहे.


दहशतवाद्यांचा प्लान बी उघड तयार होता. त्यासाठी त्यांनी देशाचं आर्थिक नुकसान करण्याचे नियोजन केले होते. याबाबत दहशतवाद्यांना आदेशही देण्यात आले होते. स्फोटात अपयश आल्यास मोठ मोठ्या कंपन्या, गोदामे, शोरुम्स यांना आगी लावा. गर्दीची ठिकाणी बघून या घटना घडवून आणण्याचे आदेश दहशतवाद्यांना देण्यात आले होते.



दहशतवाद्यांच्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे. पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा ISIच्या इशाऱ्यावर हे दहशतवादी भारतात मोठा घातपात घडवण्याच्या तयारीत होते. यापैकीच एक दहशतवादी ओसामाने घातपाताचे थेट दुबई कनेक्शन उघड केलं आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने आणि आयबीला ओसामाच्या चौकशीतून कळले की त्याचे वडील, टेरर मॉड्यूलचा मास्टरमाईंड, दुबईमध्ये मदरसा चालवतात आणि आयएसआयच्या थेट संपर्कात आहेत. एवढेच नाही तर ओसामाचा मामा हुमैदूर रहमान हा सुद्धा या दहशतवादी मॉड्यूलचा एक भाग आहे. ओसामाची चौकशी आणि मोबाईलवरून मिळालेल्या चॅटमधून हे सर्व उघड झाले आहे.