नवी दिल्ली : काश्मीरमध्ये सतत दहशतवादी कारवाया करणाऱ्या दहशतवादी संघटना आता दिल्ली आणि युपीवर दहशतवादी हल्ल्याचा कट रचत आहेत. गुप्तचर यंत्रणांना मिळालेल्या माहितीनुसार, नेपाळ आणि बांगलादेशच्या मार्गे दहशतवादी भारतात घुसखोरी करु शकतात. दिल्ली आणि यूपीत दहशतवादी हल्ल्याचा प्रयत्न या दहशतवादी संघटनांकडून होऊ शकतो. भारतीय जवानांच्या ट्रेनिंग कॅम्पला दहशतवाद्यांकडून लक्ष्य केलं जाण्याची शक्यता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुप्तचर यंत्रणांना अशी माहिती मिळाली आहे की, दहशतवाद्यांना ओव्हर ग्राउंड वर्कर्स पंजाब किंवा जम्मू-काश्मीरमधून हत्यारं आणि इतर सामग्री पुरवली जाऊ शकते. गुप्तचर यंत्रणांना अशी माहिती मिळाली आहे की, अयोध्यामधील राम मंदिरावर काही दिवसातच निर्णय़ येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाकिस्तानातील दहशतवादी संघटना देशात अशांतता पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत.


सूत्रांच्या माहितीनुसार काश्मीरमधील अनुच्छेद 370 हटवल्यानंतर दहशतवादी काश्मीर आणि मेट्रो सिटीला लक्ष्य करु शकतात. पण आता राम मंदिराचा निर्णय येण्याआधी उत्तर प्रदेशमध्येदेखील हायअलर्ट असणार आहे.