श्रीनगर : जम्मूत भारतीय सैन्याच्या छावणीला पुन्हा दहशतवाद्यांनी लक्ष्य केले आहे. जम्मूतल्या सुंजुवान लष्करी छावणीवर दहशतवाद्यांनी गोळीबार केलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये अजूनही चकमक सुरु आहे. यात भारतीय सैन्याचे तीन जवान जखमी झालेत. नागरी भागातून काही दहशतवादी लष्कराच्या या छावणीत घुसल्याची माहिती आहे.



दरम्यान, या घटनेनंतर जम्मूमध्ये अतिदक्षतेचा इशारा देण्यात आलाय. त्याआधी रुग्णालयात ६ दहशतवाद्यांना चेकअपसाठी आणले असताना एका अतिरेक्यांने पोलिसांची बंदूक हिसकावून गोळीबार केला. यात एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. तर एकजण गंभीर जखमी झाला. त्याचवेळी जहाल अतिरेकी पळवून नेण्यात काही अतिरेकी यशस्वी झालेत.