भारतातील या गावात राहतात रावणाचे पूर्वज, रावणाची करतात पूजा!
दसऱ्याच्या दिवशी सगळीकडे रावण दहन केला जातो. पण या गावात मात्र रावनाची पूजा केली जाते.
पोपट पिटेकर, झी मीडिया, मुंबई : दसरा हा सण (Dussehra festival) मोठ्या थाटामाटात देशात साजरा केला जातो. हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो. कारण या दिवशी प्रभू श्रीरामांनी (Shree Ram) रावणाचा वध करून सीतेला मुक्त केले होते. आणि तेव्हापासून दसऱ्याच्या दिवशी सर्वत्र रावणाच्या पुतळ्याचे दहन केले जाते. पण तुम्हाला हे जाणून थोडं आश्चर्य वाटेल की भारतात अशी अनेक गावं आहेत जिथे रावणाचा पुतळा जाळला जात नाही तर पूजा केली जाते.
रावणाचा जन्म कुठे झाला?
रावणाचा जन्म (Birth of Ravana) भारतातील उत्तर प्रदेशातील गौतम बुद्ध नगर जिल्ह्यातील बिसरख गावात ( Bisarakh village) झाला. जे राजधानी दिल्लीपासून अवघ्या 40 किमी अंतरावर आहे. रावण हा आपला पूर्वज असल्याचे येथील लोक मानतात. एवढेच नाही तर दसऱ्याच्या दिवशी रावणाचं दहनही (Burning of Ravana) केले जात नाही. आणि या गावात दस-यादिवशी कोणताही सण साजरा केला जात नाही. या गावात दशनानाचे मंदिर असून येथील लोकही त्याची पूजा करतात.
रावणाच्या आजोबांकडून शिवलिंगाची स्थापना
रावणाचे आजोबा पुलस्त्य (Ravana's grandfather Pulastya)यांनी बिसरख गावात रावणाच्या मंदिरात शिवलिंगाची स्थापना केल्याचे सांगितले जाते. जिथे रावणाचे वडील आणि रावणानेही शिवलिंगासमोर तपश्चर्या केल्याचे सांगण्यात येतय. बिसरख गावाच्या मध्यभागी बांधलेले रावणाचे मंदिर (Temple of Ravana) आकर्षणाचे केंद्र आहे. हे मंदिर भोलेनाथाला समर्पित आहे.
रावणाचं शिक्षण या ठिकाणी
बिसरख गाव हे अष्टकोनी शिवलिंगाची स्थापना करणारे देशातील पहिले स्थान आहे. याच ठिकाणी रावणाचे शिक्षण(Education of Ravana) झाले. आणि त्याचा भाऊ, बहीण कुंभकरण, शूर्पणखा आणि विभीषण यांचा जन्मही येथे झाला. कारण रावणाचे वडील विश्व ऋषी (Ravana's father Vishwa Rishi) यांचे गाव बिसराख होते.
रावणाचा पुतळा जाळ्याला विरोध
देशातील बहुतांश भागात दसऱ्याच्या दिवशी रावणाचे दहन केले जाते. मात्र बिसरख गावात रावणाच्या पुतळ्याचं दहन केलं जात नाही. कारण हे आहे की काही वर्षापूर्वी या गावातील लोकांनी रावणाचा पुतळा जाळला होता. त्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागल्याने गावात रावणाचं दहन बंद (Ravana's burning stopped) करण्यात आलय. तसेच दसरा न साजरा करण्याबाबत येथील लोक अनेक कथा सांगतात.