मुंबई : पंतप्रधान मोदी सरकारने चिनी ऍप्सवर बंदी आणल्यानंतर आता काही भारतीय  ऍप्सची लोकप्रियता अधिक वाढली आहे. एनालिटिक्स प्लॅटफॉर्म सेन्सर टॉवरच्या अहवालानुसार 59 चिनी ऍप्सवर बंदी घातल्याचा सर्वाधिक फायदा रोपोसो (Roposo)आणि शेयरचॅट (sharechat) या ऍप्सना अधिक झाल्याचं दिसून येत आहे. सेन्सर टॉवरने 29 जून ते 8 जुलै या कालावधीतील डेटा जारी केला आहे. माहितीनुसार शेअरचॅट डाऊनलोडमध्ये 257 टक्के आणि रोपोसा अॅपच्या डाऊनलोडमध्ये 82 टक्क्यांनी  वाढ झाली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शॉर्ट व्हिडिओ प्लॅटफॉर्म रोपोसो आधीपासूनच एक लोकप्रिय ऍप आहे, परंतु चिनी अ‍ॅप्सच्या बंदीमुळे स्मार्टफेन युजर्सने आपला मोर्चा रोपोसो ऍपकडे वळवला आहे. 19 जून ते 28 जून दरम्यान 4,900,000 वेळा डाउनलोड करण्यात आला. परंतु 29 जून ते  जुलै या कालावधीत हा आकडा 8,900,000 घरात पोहोचला आहे. 


रोपोसोचा दावा आहे की आता भारतात त्याचे 65 दशलक्ष वापरकर्ते आहेत. रोपोसो शिवाय शेअरचॅट या ऍपला देखील मोठा फायदा झाला आहे. 19 जून ते 28 जून दरम्यान 1,400,000 स्मार्टफोन युजर्सनी डाउनलोड केले होते. परंतु त्यानंतर अवघ्या 10 दिवसांत 5,000,000 स्मार्टफोन युजर्सनी हे अ‍ॅप डाउनलोड केले. म्हणजेच डाउनलोडमध्ये 257 टक्क्यांनी वाढ झाली.