नवी दिल्ली : देशातच नव्हे तर संपूर्ण जगात कोरोनाचं सावट पाहायला मिळत आहे. पण गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. मात्र परिस्थिती अद्यापही पूर्णपणे नियंत्रणात आलेली नाही. असं देखली सांगण्यात येत आहे. त्यामुळे प्रत्येकाने नियमांचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे. दरम्यान काल दिवसभरात ५८० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांच्या तुलनेत ही सख्या अतिशय दिलासा देणारी आहे. ९८ दिवसांमध्ये पहिल्यांदाच इतक्या कमी मृत्यूंची नोंद झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सप्टेंबरमध्ये देशात कोरोना व्हायरसने हाहाःकार माजवला होता. १५ सप्टेंबर रोजी देशात कोरोनामुळे १ हजार २७५ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला. मात्र अता परिस्थिती नियंत्रणात येत आहे. काल दिवसभरात ५८० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. ९८ दिवसांमध्ये पहिल्यांदाच इतक्या कमी मृत्यूंची नोंद झाली आहे. 


देशात आतापर्यंत ७८ लाख ६३ हजार ९९९ रुग्णआहेत. सध्या ६ लाख ७५ हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर ७० लाख ६९ हजार ९९९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. काल देशभरात ५१ हजार २३ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. त्यामुळे कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९.९ टक्क्यांवर पोहोचले आहे. 


महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रात देखील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. सलग साहव्या दिवशी संख्येत घट होताना दिसत आहे. काल महाराष्ट्रात ६ हजार ४१७ नव्या रुग्णांची नोंद झाली तर १३७ जणांचा मृत्यू झाला.