देशात 1 मेपासून 18 वर्षावरील सर्वांना लस देणार, पण इतक्या लस आहेत का? जाणून घ्या
उत्पादनवाढीसाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक वाढीवर भर
नवी दिल्ली : देशात 1 मे पासून 18 वर्षावरील सर्वांनाच लस देण्यात येणार आहे. पण त्यासाठी तेवढ्या लसीही असणंही गरजेचं आहे. मुंबईसारख्या (Mumbai Vaccination) शहरात आजच्या घडीला लसीच्या अभावामुळे लसीकरण केंद्र (Vaccination Centre) आलाय. लसीकरणाचा पुरवठा व्हावा यासाठी भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन (Bharat Biotech Covaccine) उत्पादन वाढवण्यात येणार आहे. यासाठी वर्षाला 70कोटींचं लक्ष भारत बायोटेकनं ठेवलंय. हैद्राबाद आणि बंगळुरुमधल्या प्रकल्पात टप्प्याटप्प्यानं निर्मिती वाढवणार आहे. उत्पादनवाढीसाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक वाढीवर भर दिला जातोय.
भारत बायोटेक कंपनी आपली उत्पादन क्षमता कमी कालावधीत वाढवणार आहे. यासाठी कंपनीकडे बीएसएल ३ सुविधा उपलब्ध झाली आहे. हैदराबाद आणि बेंगळुरू येथील दोन प्रकल्पात टप्प्याटप्प्याने लसीकरण निर्मितीचे काम सुरु आहे. सध्या कंपनीची क्षमता वार्षिक २० कोटी लस बनविण्याची आहे. पण टप्प्याटप्याने यात वाढ होतेय. यासाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करावी लागते असे कंपनीकडून जाहीर करण्यात आलेल्या निवेदनात म्हटलंय.
देशातील रुग्णसंख्या वाढली
देशात कोरोना रूग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. कोरोनाची ही दुसरी लाट अतिशय भयंकर असल्याचं सांगितलं जात आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रत्येकाने नियमांचं पालन करणं महत्त्वाचं आहे. कोरोनाची ही लाट शमवण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकार युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहेत. अनेक ठिकाणी लॉकडाऊनदेखील करण्यात आलं आहे. आरोग्य मंत्रालयाने गेल्या 24 तासांतील कोरोना रूग्णांची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
कोरोनाचा कहर पाहाता गेल्या 24 तासांत भारतात 1 हजार 716 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर तब्बल 2 लाख 59 हजार 170 नव्या कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. आता पर्यंत भारतात 1 लाख 80 हजार 530 रूग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. तर 1, 31,08,8582 रूग्ण कोरोनाच्या विळख्यातून सुखरूप बाहेर पडले आहेत. देशात 20 लाख 31 हजार 977 रूग्मांवर उपचार सुरू आहेत.
राज्यात 58,924 नवीन रुग्णांचे निदान झाले आहेत. राज्यात आज 351 करोना बाधित रूग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.56% एवढा आहे. शनिवार, रविवारच्या लॉकडाऊननंतर सोमवारी आतापर्यंतच्या तुलनेत 10 हजार कोरोनाबाझाल्याधित कमीची नोंद आहे.