Chandrayaan - 3 : भारताची चांद्रयान 3 मोहिम यशस्वी झाली आहे. 23 ऑगस्ट रोजी चांद्रयान 3 ने चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिग केले. चंद्रावर एक दिवस हा पृथ्वीच्या 14 दिवसांप्रमाणे असतो. लवकरत चंद्रावर अंधार होणार आहे. चंद्रावर दिवस संपून रात्र झाल्यावर चांद्रयान 3 मोहिमेचे काय होणार? विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर काय करणार? याची प्लानिंग झालेली आहे. चंद्रावर रात्र झाली तरी भारताची चांद्रयान 3 मोहिम सुरु राहणार आहे. 


चंद्रावर सूर्योदय होत असताना चंद्रायान 3 चे लँडिग


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

14 जुलै 2023 रोजी भारताचे चंद्रायान 3 चंद्राकडे झेपावेल. साधारण 40 दिवसांचा प्रवास करुन 23 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजून 4 मिनीटांनी  भारताचे चंद्रायान 3 चंद्रावर सुरक्षितरित्या उतरले. ज्यावेळी चंद्रायान 3 चंद्रावर लँडिंग करत होते. त्यावेळेस चंद्रावर सूर्योदय होत होता. यामुळे विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर चंद्रावर संधोशन करण्यासाठी  14 दिवस मिळाले आहेत. 


चंद्रावर रात्र झाल्यावर विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर काय करणार?


5 किंवा 6 सप्टेंबरला सूर्य अस्ताला जाईल. चंद्रावर रात्र होईल. चंद्राचा पृष्ठभाग अंधारात गुडूप होईल. अंधारात संधोशन करणे आव्हानात्मक ठरु शकते. तसेच चंद्रावर दिवसा आणि रात्रीचे तापमान वेगळे आहे. यामुळे रात्रीच्या वेळेस चंद्रावर मायनस 100 पेक्षा कमी तापमान असते. यामुळे येथील हवामान कसे असेल हे सांगण देखील कठिण आहे. 


आधीच सिस्टिम बंद करणार


चंद्रावर रात्र होण्याआधी  विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर यांच्या बॅटरी पूर्णपणे चार्ज करुन सिस्टिम बंद केल्या जाणार आहेत. यानंतर रात्र झाल्यावर गरज पडेल तेव्हा यांचे सिस्टिम ऑन करता येवू शकतात. विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर यांच्या पृष्ठभागावर सोलर पॅनल बसवण्यात आले आहेत. चंद्रावर पुन्हा सूर्योदय होवून दिवस सुरु झाल्यावर विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर यांच्या बॅटरी सूर्य प्रकाशात चार्ज केल्या जातील. यानंतर पुन्हा विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर संशोधन सुरु करतील. 


विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर यांच्यावर बसवलेत पेलोड


विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर यांच्यावर बसवलेत पेलोड अर्थात उपकरण बवलण्यात आली आहेत. यांच्या मदतीने चंद्राच्या पृष्ठभागावरील तापमान तसेच भूकंप होतात का याचे संशोधन केले जात आहे. तसेच चंद्रावर पाण्याचा, बर्फाचा आणि खनिजांचा शोध घेतला जात आहे.