Uttarakhand Crime News :  जे पोलिसांना जमले नाही ते एका कुत्रीने करुन दाखवलं आहे. या कुत्रीने फक्त 20 सेकंदात खुनी शोधला आहे. ही कुत्री उत्तराखंडच्या उधम सिंह नगर पोलिसांच्या श्वान पथकात कार्यरत आहे.  जर्मन शेफर्ड जातीच्या या कुत्रीचे नाव कॅटी असे आहे. तिच्या या विशेष कामगिरीबाबत पोलिस दलातर्फे तिला पर्सनल ऑफ द मंथ या पदावीने सन्मानित करण्यात आले  आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तराखंडमधील जसपूरमधील बदियानवाला गावातील  हे प्रकरण आहे. येथे राहणारे साकिब याचा मुलगा अनीस अहमद याची चार दिवसांपूर्वी हत्या झाली होती. साकिबचा मृतदेह आढळून आला होता यामुळे एकच खळबळ उडाली होती. या घटनेची माहिती मिळताच पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. मात्र, कोणताही पुरावा पोलिसांच्या हाती लागत नव्हता. यामुळे मृत अहमद याचे कुटुंबिय आक्रमक झाले. तात्काळ मारेकऱ्याला शोधावे  अशी मागणी करत त्यानी थेट पोलिस ठाण्यात मोठा गोंधळ घातला. 


पोलिसांनी तपासाची गती आणखी वाढली. पोलिसांनी श्वान पछकाची मदत घेण्याचा निर्णय घेतला. पोलिस श्वान पथकाला घेऊन घटनास्थळी दाखल झाले. याच श्वान पथकात कॅटीचा समावेश होता. 


असा सापडला खुनी


ज्या ठिकाणी अनीसचा मृतदेह आढळला तेथे कॅटीने वास घेतला. यांनतर घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका व्यक्तीच्या अंगावर कॅटी धावून गेली. हे सर्व कॅटीने फक्त 20 सेकंदात केले. कॅटीने ज्या खुन्याला ओळखले तो व्यक्ती अहमद याचा चुलत भाऊ आहे. त्यानेच अहमद याची हत्या केली.


अहमदची हत्या का केली?


कॅटीने खुनी ओळखल्यावर अहमदच्या चुलत भावाची पोलिसांनी चौकशी केली. आधी त्याने उडवाउडवीची उत्तरे दिले. मात्र, पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच त्याने हत्येची कबुली दिली. साकिब असे आरोपीचे नाव आहे.  साकिब आणि अनीस दोघेही एकत्र दारु पित होते. यावेळी त्यांच्यात वाद झाला. याच वादात साकिब याने पँटच्या बेल्टने अनीस याचा गळा आवळून त्याची हत्या केली. यानंतर आपण पकडले जाऊ नये यासाठी अनीस याचा मृत्यू जनावरच्या हल्यात झाल्याचा दाखवण्याचा प्लान बनवला. यासाठी साकिबने अनिसचा मृतदेह शेतात फेकला आणि त्याच्या मृतदेहावर जनावरे सोडली. यानंतर त्याने घटनास्थळावरुन धूम ठोकली. अनीस याचा मृतदेहावर जनावरांनी पंजा मारल्याच्या खुना आढळून आल्या आहेत. यामुळे त्याच्या हत्येचा उलगडा करण्यात पोलिसांना काहीच सुगावा मिळत नव्हता. कॅटीन मात्र, अवघ्या सेकंदात या हत्या प्रकरणाचा छडा लावला आहे.