Sonam Wangchuk Hunger Strike : 'थ्री इडियट्स' हा चित्रपटाचा खरा खुरा हिरो सोनम वांगचुक तब्बल 21 दिवसांपासून उपोषणावर होतो. बर्फवृष्टी असो किंवा थंडीचा कडाका कसलीही पर्वा न करता 6 मार्चपासून सामाजिक कार्यकर्ते, पर्यावरणवादी, इनोव्हेटर आणि शिक्षणसुधारक वांगचुक उपोषणावर होते. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपल्या उपोषणाचे 21-21 दिवसांचे टप्प्यांची रणनिती त्यांनी आखली आहे. (The fight will continue Sonam Wangchuk quits hunger strike after 21 days what is the real issue)


काय आहे नेमकं प्रकरण?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्रशासित प्रदेश असलेल्या लडाखला सहाव्या अनुसूचीअंतर्गत राज्याचा दर्जा मिळावा आणि घटनात्मक सुरक्षा प्रदान केली जावी या मागणीसाठी सोनम वांगचुक यांनी उपोषणाचे हत्यार उपसलंय. लडाखसाठी लोकसभेच्या दोन आणि राज्यसभेच्या एका जागेची मागणी त्यांनी केलीय. 21 व्या दिवशी उपोषण सोडताना त्यांनी स्पष्ट केलंय की हा लढा इथेच संपणार नाही, असा इशारा दिलाय. या उपोषणाचा पुढचा टप्पा म्हणजे आजपासून महिलांचा एक गट 10 दिवस उपोषणाला बसला आहे. सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला देशभरातील लोकांनी पाठिंबा दर्शविला आहे. 



हा लढा असाच सुरु राहिल!


21 व्या दिवशी उपोषण सोडताना सोनम वांगचुक म्हणाले की, माझ्या उपोषणाचा पहिला टप्पा संपलाय. आता महिला गट 10 दिवस उपोषणाला बसणार आहे. त्यानंतर तरुण, मग मठांतील भिक्षू...मग मी पुन्हा असा हा लढा पुढे जाणार आहे. 



एवढंच नाही तर त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचे आवाहन त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींना केलाय. या व्हिडीओमध्ये त्यांची तब्येत खालावली गेल्याची जाणवत आहे. तर लडाखच्या लोकांनी राष्ट्रहिताच्या दृष्टीने अत्यंत काळजीपूर्वक मतदान करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केलंय.