नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायायलाने पुनर्विचार याचिका फेटाळ्यानं पुढच्या आठवड्यात जवळपास दीड लाख कोटी रुपये सरकार दरबारी भरण्याची वेळ आली आहे. एकूण थकबाकी १.४७ लाख कोटी रुपयांच्या घरात आहेत. त्यापैकी व्होडाफोन आयडीया आणि भारती एअरटेलची मिळून थकबाकी १.०२ कोटी रुपयांची थकबाकी आहे. सगळ्या कंपन्यांमध्ये व्होडाफोन आयडीयाची स्थिती सर्वात बिकट आहे. दरम्यान टेलिकॉम कंपन्यांचं भवितव्य अडचणीत आल्यानं, बँकांनाही मोठा फटका बसणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आधीच तोट्यात चाललेल्या कंपनीची ग्राहक संख्याही दिवसेंदिवस घटत आहे. टीआरएआयनं जारी केलेल्या आकडेवारीत डिसेंबर महिन्यात आयडिया व्होडाफोनच्या ग्राहकांची संख्या जवळपास ३६ लाखांनी घटली आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या या कंपनीनं पैसे वाढवून भरण्याची मुदत वाढवण्याचे सगळे प्रयत्न केले आहेत. 



पण त्याचा फारसा उपयोग झालेला नाही. सर्वोच्च न्यायालयानं याचिका फेटाळल्यावर आता क्युरेटिव्ह पिटीशन दाखल करण्याचा विचार सुरु केलाय.  पण प्रकरणावर इतका काथ्याकुट झालाय की त्यातूनही फारसं काही हाती लागले असं नाही. त्यामुळे व्होडाफोन आयडियाचं भवितव्य चांगलंच अडचणीत आले आहे.