नवी दिल्ली : जगातील कुख्यात दहशतवादी ओसामा बिन लादेनला अमेरिकेच्या कमांडोंनी पाकिस्तानात घुसून मारलं होतं. पण कदाचित तुम्हाला माहित नसेल अमेरिकेच्या कमांडोंनी लादेनला मारण्यासाठी कोणत्या हत्याराचा वापर केला होता. अमेरिकेच्या कमांडोंनी या मिशनसाठी आधुनिक लेजर गायडेड एम 4 ए-1 कार्बाइनचा वापर केला होता. याच कार्बाइन हत्याराचा वापर भारतीय जवान मलेशियाच्या दाट जंगलामध्ये करणार आहे, भारतीय लष्कराकडे अजून हे हत्यार नाही आहे पण लवकरच ते भारतीय जवानांना मिळणार असल्याची शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रात्रीच्या वेळी निशाना साधच 600 मीटरपर्यंत अचूक मारा करणारी लेजर गायडेड टेक्निकचा हा कार्बाइन 700 ते 950 राउंड प्रती मिनिटाने गोळ्या सोडतो. मलेशिया पहिल्यांदा होणाऱ्या या संयुक्त युद्धाभ्यासात वेगवेगळ्या हत्यारांचा वापर केला जाणार आहे.