जमिनीवर धावणाऱ्या हिरो सायकलची आकाशाला गवसणी घालणारी प्रेरणादायी कहाणी...
तुम्हाला आठवत असेलच की “कैसा भी हो जहान, अब उड़ना है आसान… छूना है आसमान, अब उड़ना है आसान….” ही हिरो सायकलची जाहिरात... ज्याने 6 दशकातील यशाची रंजक कहाणी...
पोपट पिटेकर,झी मीडिया, मुंबई : देशात आजही प्रवासासाठी सायकलचा वापर (Bicycle for travel) मोठ्या प्रमाणात केला जातो. ग्रामीण भागात देखील दळणवळणाचं साधन म्हणजे सायकल. शेतकरी, शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन तरुण, तरुणी, नागरीक, तसेच आता नोकारदार देखील सायकल वापरण्यात मोठ्या प्रमाणात अग्रेसर आहेत. ग्रामीण भागात तर पूर्वी ज्याच्याकडे सायकल (Bicycle) आहे, त्याला गावात मोठा माणूस म्हणून समजलं जायचं. कोणत्याही खर्चाविना, प्रदूषणाविना प्रवास (Cost-free, pollution-free travel) होत असल्याने आणि आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर (Beneficial in terms of health) ठरत असल्याने गावाकडे सायकल चालविण्याला चांगल्या प्रकारे प्राधान्य दिलं जातं. अनेकांच्या घरांबाहेर आजही जुन्या सायकली (Old bicycles) उभ्या असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात.
सायकलचा शोध
सर्वात पहिली सायकलची रूपरेखा (Outline of a cycle) बैरन फॉन ड्रेविस (Baron von Drevis) यांनी 1817 मध्ये तयार केली होती. त्यांनी लाकडाची सायकल बनवली होती. ज्याचे नाव होते ड्रेसियेन (ड्रेसियेन). ही सायकल जवळ जवळ 15 किमी प्रती तास इतक्या वेगाने चालत होती. तसेच आधुनिक सायकलचा शोध लावण्याचे पूर्ण श्रेय किर्कपैट्रिक मैकमिलन (Kirkpatrick Macmillan) यांना जाते. त्यांनी हा शोध 1839 मध्ये स्कॉटलंडमध्ये (Scotland) लावला होता. आधुनिक सायकलचा शोध लागल्यामुळे सायकल पायाने चालवणे शक्य झाले.
हिरो सायकल आणि मुंजाल ब्रदर्स
जसजसा काळ बदलला तशी गावालाही शहरीकरणाची हवा लागली. तेथेही दुचाकींचे प्रमाण वाढलं. मात्र अशा स्थितीत शहरात आणि ग्रामीण भागात सायक (Bicycles in the countryside) चालवणे जपलं आहे. तुम्हाला आठवत असेलच की “कैसा भी हो जहान, अब उड़ना है आसान… छूना है आसमान, अब उड़ना है आसान….” ही हिरो सायकलची जाहिरात... ज्याने 6 दशकातील यशाची रंजक कहाणी लिहिलीय. जिथे पोहोचणे इतर कंपन्यांना शक्य नाही.
हिरो ब्रँडचा जन्म
पाकिस्तानच्या (Pakistan) तोबटेक सिंग जिल्ह्यातील कमलिया गावात ब्रिजमोहन लाल मुंजाल (Brijmohan Lal Munjal) आणि त्यांचे तीन भाऊ दयानंद, सत्यानंद आणि ओमप्रकाश मुंजाल (Dayanand, Satyanand Omprakash Munjal) हे राहत असतं. पाकिस्तानातून फाळणीपूर्वीच ते अमृतसरला (Amritsar) आले होते. येथे ते सायकलच्या सुट्या भागांचा व्यवसाय (Bicycle spare parts business) करत असत. एक दिवस ब्रिजमोहनने (Brijmohan) स्वतः सायकल बनवण्याचा विचार केला. त्याने आपल्या भावांना सांगितले, सर्वजण तयार झाले आणि लुधियाना (Ludhiana) येथून काम सुरू करण्याचा निर्णय घेतला. मुंजाल यांचा एक सहकारी करीम दिन नावाचा मुस्लिम माणूस पाकिस्तानला जात होता. तो त्याच्या ब्रँड नावाने सायकलचे खोगीर बनवत असे. ओमप्रकाश मुंजाळ (Omprakash Munjal) यांनी त्याला ब्रँड नेम वापरण्याची परवानगी मागितली. करीम दिनने हो म्हटलं आणि अशीच 'हिरो'ची कथा (Hero's story) सुरू झाली.
भारताची स्वदेशी सायकल
मुंजाल ब्रदर्सला सायकलचे सर्व भाग स्वतः तयार करायचे होते. परदेशी भाग महाग असल्याने आणि ते वेळेत पुरवता येत नव्हते. त्यामुळे त्यांनी सर्व पार्ट (Bicycle spare parts) स्वतः तयार करण्याचा विचार केला. 1954 मध्ये त्यांनी सायकल स्पिंरिग (Cycle spinrig) तयार करण्याचा पहिला प्रयोग केला. यानंतर ते रामगढिया समाजाकडे सायकलचे हँडल (Bicycle handle) बनवण्यासाठी गेले. जे रामगढिया हे पारंपरिक कारागीर हँडल बनवण्यात तरबेज होते. मुंजाल ब्रदर्स (Munjal Brothers) यांना सायकलची फ्रेम दोन-तीन लोक चालतील अशा पद्धतीने बनवायची होती. यात ते यशस्वी झाले. मग स्वदेशी कारखान्यात मडगार्ड आणि हँडलबारही (Indigenous factory mudguards and handlebars) बनवले गेले. आणि अशा प्रकारे भारताचे 100 टक्के स्वदेशी सायकल (Indigenous bicycle) तयारी झाली.
कर्ज आणि पहिला कारखाना
सुंदर देशी सायकल पाहून ब्रिजमोहन लोल मुंजाळ (Brijmohan Lol Munjal) हे आनंद आणि उत्साही झाले. त्यांनतर त्यांनी त्यावर प्रवास केला. प्रवास केल्यानंतर कारखाना (Bicycle factory) काढण्याचा विचार केला. आणि 1956 साली त्यांनी बँकेकडून 50 हजाराचं कर्ज घेतलं. तसेच पंजाब सरकारकडून सायकल बनवण्याचा कारखान्याचा परवाना (Bicycle License) घेऊन कारखाना सुरू केला.
हिरो सायकल, आजपर्यंतचा प्रवास
लुधियाना येथे 1956 मध्ये कारखाना सुरु केल्यानंतर 1986 मध्ये एका दिवसात तब्बल 18 हजार 500 सायकल बनवण्याचा विक्रम (Bicycle making record) केला. 2007 मध्ये हीरो मोटर्स (Hero Motors) आणि किर्यू कॉर्पोरेशनसह (Kiryu Corporation) संयुक्त उपक्रम राबवण्यात आला. 2010 मध्ये हीरो मोटर्स (Hero Motors) आणि ZF हिरो चेसिस (Hero chassis) यांच्यातील संयुक्त उपक्रम घेतला गेला. तसेच 2012 मध्ये सर्वात जास्त 13 कोटी सायकलचे उत्पादन (Production of bicycles) करण्यात आलं. 2014 मध्ये बिहटा, बिहार येथे प्लांट (Plant at Bihata, Bihar) सुरु करुन 10 लाख युनिट उत्पादन करण्यात आलं. 2015 मध्ये फायरफॉक्स बाइक्स आणि इनसिंक बाइक्स (Firefox Bikes and InSync Bikes) घेतल्या गेल्या. हीरा सायकल्स लिमिटेडने युरोपियन बाजारपेठेत (Heera Cycles Limited in the European market) 2016 साली प्रवेश केला. इलेक्ट्रिक सायकलच्या (Electric bicycle) व्यवसायात 2018 मध्ये प्रवेश करण्यात आला. 2020 मध्ये जर्मन ई-बाईक कंपनी (German e-bike company) HNF चे अधिग्रहण केलं गेलं. आणि 2021 मध्ये ई-बाईकची पहिली तुकडी (The first batch of e-bikes) तयार करून युरोपला पाठवण्यात आली.
सार्वजनिक कंपनी स्थापनेची इच्छा
मुंजाल ब्रदर्सने सायकल क्षेत्रात झपाड्याने प्रगती केल्यानंतर आता अलीकडच्या काळात ओमप्रकाश मुंजाळ यांचा मुलगा पंकज मुंजाळ (Pankaj Munjal) याने कंपनीचे वाहन पुढे नेले.आज हिरो सायकलची (Hero Cycle) उलाढाल पाहिलं तर काही हजार कोटींमध्ये आहे. त्यामुळेच आता कंपनीचा IPO बाजारात आणून 2024 पर्यंत सार्वजनिक कंपनी बनवण्याचा विचार (Desire to set up a public company) मुंदाल ब्रदर्सचा आहे.
आंतरराष्ट्रीय सायकल दिवस
देशात अनेक नवनवीन वाहन बाजारात येत असतानाही देशात सायकल हा दिवस साजरा (International Bicycle Day) मोठ्या प्रमाणात केला जातो. संयुक्त राष्ट्र संघाद्वारे 2018 मध्ये आंतरराष्ट्रीय सायकल दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली. आंतरराष्ट्रीय सायकल दिवस हा दरवर्षी 3 जून रोजी साजरा केला जातो. लोकांच्या मनामध्ये सायकलच्या प्रति उपयोग आणि जागरूकता निर्माण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सायकल दिवस मोठ्या प्रमाणात करण्यात येतो.