त्याने सिंहाच्या जबड्यात घातला हात... संतापलेल्या सिंहाने पुढे काय केलं पाहा
एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओ मध्ये सिंहाची मस्करी करणं एकाला चांगलंच महागात पडलं आहे
Shocking Video: सिंह ( LION ) काही मांजरासारखा (CAT) शांत नाही किंवा कुत्र्यासारखा (Dog) माणसाळलेला प्राणी नाही. सिंह हा जंगलाचा राजा आहे. त्याच्यापासून लांब राहण्यातच भले आहे. तो जंगलात असला काय किंवा पिंजऱ्यात असला काय शेवटी सिंह तो सिंहच. हिंस्त्र प्राण्यांच्या यादीत सिंहाचे अग्रस्थान आहे. मात्र अनेकांना याचा विसर पडतो. प्राणी संग्राहलयात सुद्धा प्रत्येक पिंजऱ्याच्या बाहेर सूचना लिहलेल्या असतात. मात्र काही जण या सूचनांकडे दुर्लक्ष करतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय (Viral Video) . या व्हिडीओ मध्ये सिंहाची मस्करी करणं एकाला चांगलंच महागात पडलं आहे.
खतरनाक व्हिडीओ
या व्हिडीओत एक व्यक्ती प्राणी संग्राहलायत येतो. प्राणी संग्राहलयातील सगळ्या पिंजऱ्यांतील प्राण्यांना पाहात तो सिंहाच्या पिंजऱ्या जवळ थांबतो. मात्र याला सिंहासोबत खेळायचं असतं. मग तो सिंहा सोबत खेळण्याचा प्रयत्न करु लागतो. पिंजऱ्यात असणाऱ्या सिंहाची मस्करी करण्यात गूंग होतो. कधी तो सिंहाची आयाळ ओढतो. तर कधी सिंहाच्या तोंडात हात घालण्याचा प्रयत्न करतो. हा खेळ बराच वेळ चालू असतो. सिंहाची मस्करी करणाऱ्याला वाटतं असावं की, सिंह पिंजऱ्यात आहे. आपल्याला काही करणार नाही. पण सिंह तो सिंहच. अखेर सिंहाने संधी साधली आणि या व्यक्तीचं बोटच पकडलं. जीवाच्या अकांताने ही व्यक्ती ओरडतं होती. आपली पूर्ण ताकद पणाला लावून ती व्यक्ती आपली सुटका करत होती. पण सिंहाच्या ताकदीपुढे त्याची शक्ती कमी पडत होती. सिंह काही बोट सोडायचं नाव घेत नव्हता. अखेर कशीबशी सुटका त्याने करुन घेतली.
अखेर बोट गमावलं
सिंहाची मस्करी करनं याला भलतच महागात पडलं. त्याने सिंहाच्या जबड्यातून आपल्या हाताची सुटका तर केली. पण बोट मात्र गामावलं ( a lion eats a finger) . हा व्हिडीओ अफ्रिकेच्या प्राणी संग्राहलयातील आहे. सध्या जोरदार व्हायरल होतोय. जर आपण प्राणी संग्राहलयात जात असाल तर पिंजऱ्यापासून लांब उभे रहा आणि सूचनांचे पालन करा. थोडक्यात काय पुढच्याला ठेच मागचा शहाणा