नवी दिल्ली : १८ विरोधीपक्षाच्या बैठकीत उपराष्ट्रपतीपदासाठी गोपाळकृष्ण गांधी यांचं नाव निश्चित करण्यात आलं आहे. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणूकीत उमेदवार निवडीसाठी आज संसदेत काँग्रेसच्या नेतृत्वात बैठक झाली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गोपाळकृष्ण गांधी हे महात्मा गांधींचे नातू असून त्यांनी १० वर्ष पश्चिम बंगालचं राज्यपालपद भूषवलं आहे. या बैठकीच्या सुरूवातीला विरोधी पक्षाच्या सर्व नेत्यांनी एकत्रपणे मिनिट मौन पाळून अमरनाथ यात्रेवर झालेल्या हल्ल्यात मृत्यांना आदरांजली वाहिली.


बैठकीला काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी, राज्यसभेत विरोधीपक्ष नेते गुलामनबी आझाद, नॅशनल कॉन्फरन्सचे ओमर अब्दुल्ला, डाव्या पक्षांचे प्रतिनिधी याबैठकीला उपस्थित होते.