Indian Railway : भारतीय रेल्वेचे जाळे देशाच्या कानाकोपऱ्यात पसरलेले आहे. सर्व राज्यांमध्ये ट्रेनचे सुविधा आहे. देशभरात हजारो रेल्वे स्थानकं आहे. प्रत्येक रेल्वे स्थानकाला नाव आहे. त्या नावानेच ही रेल्वे स्थानके ओळखली जातात. मात्र, भारतात एक असं रेल्वे स्थानक आहे जिथे  प्लॅटफॉर्म आहे. येथे ट्रेन देखील  थांबता पण या स्टेशनला नावचं नाही. जाणून घेऊया भारतात कुठे आहे हे अनोखे रेल्वे स्थानक.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतातील हे अनोखे रेल्वे स्टेशन पश्चिम बंगालच्या बर्दवान शहरापासून 35 किलोमीटर अंतरावर आहे. पश्चिम बंगालमध्ये असलेले हे रेल्वे स्टेशन 2008 पासून कोणत्याही नावाशिवाय कार्यरत आहे. इथे दररोज अनेक रेल्वे थांबतात. येथे प्रवासी उतरतात आणि चढतात. पण स्टेशनला नाव नाही. प्रवाशांनाही ते कुठे उतरवतात, याचे आश्चर्य वाटते.


हे देखील वाचा... केदारनाथ मंदिराचे सर्वात मोठे न उलगडलेले रहस्य! विज्ञानाला चॅलेंज देणारे 1200 वर्षे जुनं प्राचीन मंदिर 


या रेल्वे स्थानकाला नाव न देण्यामागे असलेले कारण वादग्रस्त आहे.  रैना आणि रायनगर गावांमधील प्रादेशिक वादामुळे या रेल्वे स्थानकाला नाव मिळालेले नाही. भारतीय रेल्वेने 2008 मध्ये जेव्हा हे स्थानक बांधले तेव्हा त्याचे नाव "रायनगर" ठेवण्यात आले होते, परंतु स्थानिक लोकांनी या नावावर आक्षेप घेत ते बदलण्याची मागणी रेल्वे बोर्डाकडे केली होती. हे प्रकरण कोर्टात गेले. रेल्वे स्थानकाला देण्यात आलेले नाव हटवण्यात आले.  तेव्हापासून हे स्टेशन कोणत्याही नावाशिवाय सुरू आहे. मात्र, याचा कोणताही परिणाम या रेल्वे स्थानकाच्या कामकाजावर झालेला नाही. येथे रेल्वेची वाहतूक सुरळित सुरु आहे. 


प्रवाशांचा गोंधळ होतो


या रेल्वे स्थानकाच्या दोन्ही बाजूला रिकामे पिवळे फलक लावण्यात आले आहेत.  प्रथमच या रेल्वे स्थानकात उतरणाऱ्या प्रवाशांचा मोठा गोंधळ उडतो. रेल्वे स्थानकाला नाव नसल्यामुळे आपण कुठे आले आहोत हेच त्यांच्या लक्षात येत नाही. यामुळे प्रवासी आजूबाजूच्या लोकांना विचारूनच ते कुठे आले आहेत याची माहिती घेतात. 


या स्थानकावर फक्त बांकुरा-मसग्राम पॅसेंजर ट्रेन थांबते. दिवस भरात या ट्रेनच्या सहा फेऱ्या होतात. रविवारी, जेव्हा स्टेशनवर कोणतीही ट्रेन येत नाही, तेव्हा स्टेशन मास्टर पुढच्या आठवड्याच्या विक्रीसाठी तिकीट खरेदी करण्यासाठी बर्दवान शहरात जातात. विशेष म्हणजे येथे विकल्या जाणाऱ्या तिकिटांवर आजही ‘रायनगर’ हे जुने नाव छापलेले आहे.