सुभाष देशमुखांवरुन दोन्ही सभागृहात गोंधळ होण्याची शक्यता
विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यातील कामकाजाला आजपासून सुरुवात होत आहे. प्रकाश मेहता, सुभाष देसाई यांच्यावरील भ्रष्टयाचाराच्या आरोपावरून आज शेतकऱ्यांच्या नावाने कर्ज उचलल्याचा आरोप केलेल्या सुभाष देशमुख यांच्यावरून विधिमंडळच्या दोन्ही सभागृहात गोंधळ होण्याची शक्यता आहे.
मुंबई : विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यातील कामकाजाला आजपासून सुरुवात होत आहे. प्रकाश मेहता, सुभाष देसाई यांच्यावरील भ्रष्टयाचाराच्या आरोपावरून आज शेतकऱ्यांच्या नावाने कर्ज उचलल्याचा आरोप केलेल्या सुभाष देशमुख यांच्यावरून विधिमंडळच्या दोन्ही सभागृहात गोंधळ होण्याची शक्यता आहे.
दोन्ही सभागृहात वेळापत्रकातील नियोजित कामकाज भरपूर आहे. असं असलं तरी मराठा आरक्षणावरील प्रश्न विधानसभेतील कामकाजामध्ये आहे. तेव्हा यांवर मराठा मोर्चाच्या पार्श्वभूमीवर सरकार काय नवे उत्तर देते हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.